शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

कौटुंबिक वादातून पतीने केली पत्नीची हत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 10:36 IST

Akola Crime News संगीताचा मृत्यू झाल्याने पती प्रशांतने स्वत:ला अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठळक मुद्देसंगीता प्रशांत इंगळे ही तिच्या दोन मुलांसह अकोट फैल परिसरात राहत होती.पती प्रशांत इंगळे हा रोजगारासाठी नाशिक येथे राहत आहे. रागाच्या भरात प्रशांतने पत्नी संगीतावर चाकूने हल्ला करत तिला ठार केले.

अकोला: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची चाकू भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री आपातापा रोडवरील दमाणी रुग्णालय परिसरात घडली. संगीता प्रशांत इंगळे असं मृत महिलेचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, आरोपी पतीने स्वत:ला अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्राप्त माहितीनुसार, मृत महिला संगीता प्रशांत इंगळे ही सहा वर्षांपासून तिच्या दोन मुलांसह अकोट फैल परिसरात राहत होती. पती प्रशांत इंगळे हा रोजगारासाठी नाशिक येथे राहत असून, त्याचे आईवडील आपातापा रोड स्थित एकता नगर परिसरात वास्तव्यास आहेत. प्रशांत हा दिवाळीसाठी आईवडिलांकडे आला होता. दरम्यान, प्रशांत हा मोठ्या मुलाला आपल्या सोबत नाशिकला घेऊन जाणार होता; मात्र मुलाला पतीसोबत नाशिकला पाठविण्याचा विरोध करत तिने मुलाला मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पती- पत्नीमध्ये वाद झाला. रागाच्या भरात प्रशांतने पत्नी संगीतावर चाकूने हल्ला करत तिला ठार केले. पत्नी संगीताचा मृत्यू झाल्याने पती प्रशांतने स्वत:ला अकोट फैल पोलिसांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलीस निरीक्षक महेंद्र कदम यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिली. ही घटना सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने अकोट फैल पोलिसांनी घटनेची माहिती सिव्हिल लाइन्स पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाइन्स पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीAkot Failअकोट फैल