शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बायकोपासून पिच्छा सोडवण्यासाठी जवानानं दिली सुपारी; ५ लाख देऊन संपवलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2021 15:52 IST

पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान महिलेची ओळख पटवणं होतं. आगर-मावला एसपीने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत महिलेचे पोस्टर सगळीकडे लावले.

मध्यप्रदेशातून पती-पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका सैनिक पतीने त्याच्या पत्नीची सुपारी देऊन हत्या केली. पोलिसांनी ७ दिवसात या खळबळजनक प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. १४ जानेवारीला सुसनेर पोलीस स्टेशन क्षेत्रातील गाव पालडाजवळ जंगलात एका अज्ञात महिलेचा मृतहेद आढळून आला. या महिलेच्या शरीरावर कपडे नव्हते आणि तोंडावर जखमेचे निशाण होते. पोस्टमार्टेमधून समोर आलं की, महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली.

पोलिसांसमोर सर्वात मोठं आव्हान महिलेची ओळख पटवणं होतं. आगर-मावला एसपीने या प्रकरणाकडे गंभीरतेने पाहत महिलेचे पोस्टर सगळीकडे लावले आणि गावागावांमध्ये महिलेबाबत विचारपूस केली. यादरम्यान समोर आले की, महिला पगारिया गावातील आहे. नंतर पोलिसांनी गावात पोहोचून महिला राहत असलेल्या घराच्या मालकाची चौकशी केली. त्यातून समोर आले की, तिचा पती अर्जुन सैनिक आहे. काही इतर लोक तिला २ हजार रूपये महिन्याचं घर भाड्याने देऊन गेलेत. महिलेचं नाव कामाक्षी असून ती मूळची छिंदवाडा येथील आहे. 

छिंदवाडा जाऊन मृत महिलेच्या परिवारातील लोकांना दफन केलेल्या शवाची ओळख पटवण्यास सांगितली. कामाक्षीच्या भावाने सांगितले की, अर्जुनने लग्नाचं आमीष दाखवत बहिणीसोबत अनैतिक संबंध ठेवले होते. ज्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यामुळे इच्छा नसतानाही अर्जुनने कामाक्षीसोबत आर्य मंदिरात लग्न केलं होतं. 

अर्जुनने आपले संबंध लपवण्यासाठी आणि पत्नीचा खात्मा करण्यासाठी ३ लोकांना ५ लाख रूपये दिले होते. तिन्ही आरोपींनी कामाक्षीला सांगितले की, तिच्या पतीने तिला आगर-मालवा येथे बोलवलं आहे. तिला कारमध्ये बसवून घेऊन गेले. रस्त्यात सेमली हरनावदाच्या जंगलात तिची गळा दाबून त्यांनी हत्या केली. तिचा मृतदेह पालडा जंगलात नेऊन फेकला.

एसपी राकेश शर्मा यांनी या प्रकरणाबाबत सांगितले की, पतीने ५ लाख देऊन आपल्या पत्नीची हत्या करून घेतली. ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या हत्येचा मास्टरमाइंड कामाक्षीचा पती अर्जुन याचा शोध घेणं सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेशMurderखून