शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
2
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
3
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
4
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
5
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
6
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
7
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
8
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
9
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
10
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
11
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
12
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
13
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
14
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
15
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
16
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
17
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
18
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
19
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
20
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन

धर्म बदलण्यासाठी पतीने जबरदस्तीने खायला लावले गोमांस, महिलेची गंभीर आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 4:02 PM

Crime News: एका २१ वर्षीय महिलेने तिच्या पतीवर विवाहासाठी जबरदस्तीने धर्म परिवर्तन करावयास लावल्याचा तसेच अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे.

रायपूर - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाईमध्ये एका २१ वर्षीय महिलेने तिच्या पतीवर विवाहासाठी जबरदस्तीने धर्म परिवर्तन करावयास लावल्याचा तसेच अनैसर्गिक पद्धतीने शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. भिलाईमधील छावनी पोलीस ठाण्यात पीडित महिलेकडून याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीमध्ये महिलेने सासरच्या लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने आरोप केला की, हिंदू धर्म बदलून मुस्लिम होण्यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली. एवढेच नाही तर तिला जबरदस्तीने गोमांसही खाण्यास भाग पाडले गेले. महिलेने केलेल्या तक्रारीवर प्राथमिक तपास केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली आहे.

छावणी पोलीस ठाण्यातील प्रभारी विशाल सोन यांनी सांगितले की, या महिलेने पती आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेच्या तक्रारीच्या आधारावर तिचा पती आणि त्याचे आई-वडील, भाऊ आणि वहिनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगितले की, महिलेचा पती, तिचे वडील आणि भावाला अटक करण्यात आली आहे. तर पतीची आई आणि वहिनी फरार आहे.

दुर्ग जिल्ह्यातील छावनी परिसरातील जेपी नगर येथे राहणाऱ्या एका महिलेने पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीत सांगितले की, तिचे त्याच भागात राहणाऱ्या एका व्यक्तीशी संबंध होते. दरम्यान, ही महिला आणि सदर पुरुष कुणालाही न सांगता घरातून फरार झाले होते. त्यानंतर आई-वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, हे दोघेही परत आले. तसेच त्यांनी कोलकातामध्ये विवाह केल्याचे छावणी पोलिसांना सांगितले. तसेच त्यासंबंधीची कागदपत्रेही सुपूर्द केली. तेव्हापासून ही महिला सासरी राहत होती. दरम्यान, आता तिने पती आणि कुटुंबीयांविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच कोलकाता येथे विवाहाआधी तिचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आले. तिच्यावर गोमांस खाण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. तसेच तिच्यासोबत अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवण्यात आले, असे आरोप केले आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChhattisgarhछत्तीसगड