शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने घरातच घेतला गळफास, नंतर पतीनेही संपवलं स्वत:चं जीवन

By शेखर पानसरे | Updated: July 19, 2023 21:07 IST

“पत्नीवर खूप जीव होता, तिची आठवण येत आहे” अशी चिठ्ठीही सापडली

शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, घारगाव: पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर सातच दिवसात पतीनेही गळफास घेऊन जीवन संपविले. “पत्नीवर खूप जीव होता, तिची आठवण येत आहे” अशी  चिठ्ठी पतीकडे सापडली. ही घटना संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे बुधवारी (दि.१९) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. तान्हाजी ज्ञानदेव बोडके (वय-३२) व त्यांची पत्नी सारिका तान्हाजी बोडके (वय-२६) असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे.

सारिका व तान्हाजी बोडके हे दाम्पत्य म्हसवंडी येथे राहत होते. त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. १३ जुलै रोजी सारिका हिने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सात दिवसानंतर बुधवारी तान्हाजी बोडके यांनी परिसरातील गवळी बाबाचे दांड येथील वनविभागाचे क्षेत्रात एका झाडाच्या फांदीला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविला. आत्महत्येपूर्वी तान्हाजी यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये “पत्नीवर खूप जीव होता, तिची आठवण येत आहे. मी आत्महत्या करत आहे. माझी जमीन मुलीला देण्यात यावी. कोणालाही दोष देऊ नये” असा मजकूर लिहिला आहे. दोघांच्याही आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत वैभव विठ्ठल बोडके यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घारगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी