शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या सौंदर्यामुळे चिंतीत पतीने विद्रुप केला तिचा चेहरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 09:22 IST

रुपवान पत्नीवर कुणाची तरी वाईट नजर पडेल म्हणून चिंतीत असलेल्या पतीने तिचा चेहरा विद्रुप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई -  रुपवान पत्नीवर कुणाची तरी वाईट नजर पडेल म्हणून चिंतीत असलेल्या पतीने तिचा चेहरा विद्रुप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पण धक्कादायक बाब म्हणजे हाच माणूस दुसऱ्या महिलांकडे मात्र वाईट नजर ठेवायचा. या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. तसेच त्याच्यावर बलात्कार आणि शोषणाचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. राज रायकवार असे या विकृत इसमाचे नाव असून, तो मध्य प्रदेशातील जबलपूर येथील रहिवासी आहे. बॉलिवूडमध्ये काम करत असल्याने तो मुंबईत वास्तव्यास असतो. तर त्याचे कुटुंबीय जबलपूर येथे राहते. 12 वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला असून, त्याला दोन मुले आहेत. मात्र पत्नी फार सुंदर असल्याने तो चिंतेत होता. आपण मुंबईत राहत असल्याने जबलपूर येथे राहणाऱ्या पत्नीवर कुणी वाईट नजर तर ठेवणार नाही ना, असे त्याला नेहमी वाटे. त्यामुळे एके दिवशी त्याने मच्छर मारण्याच्या कॉईल लावण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पत्र्याच्या स्टँडच्या पत्र्याने पत्नीच्या चेहऱ्यावर वार करून तिला जखमी केले. दरम्यान, या विकृताच्या पत्नीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार  मुंबईतील सहार परिसरातील एका अल्पवयीन मुलीला रायकवार याने खाऊ देण्याचे आमिष दाखवून आपल्या घरी नेले होते. तेथे त्याने तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला अटक केल्यानंतर जबलपूर येथे त्याने आपल्या पत्नीसोबत केलेल्या घृणास्पद कृत्याचा उलगडा झाला होता. तसेच त्याच्याविरोधात शोषणाचा अजून एक गुन्हा दाखल असल्याचेही समोर आले होते.  

टॅग्स :newsबातम्याMumbai policeमुंबई पोलीसArrestअटकMadhya Pradeshमध्य प्रदेश