शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:52 IST

एका पतीने आपले कर्ज फेडण्यासाठी आपल्याच पत्नीचा सौदा मित्राशी केला.

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून नात्यांना काळिमा फासणारी आणि अत्यंत लाजिरवाणी घटना समोर आली आहे. एका पतीने आपले कर्ज फेडण्यासाठी आपल्याच पत्नीचा सौदा मित्राशी केला. त्याने आपल्या पत्नीला मित्राला विकले आणि त्या मित्रानेही महिलेवर पाशवी अत्याचार केले. या घटनेनंतर पीडित महिलेने 'झिरो एफआयआर' (Zero FIR) दाखल केली आहे. महिलेची ही हृदयद्रावक कहाणी ऐकून खुद्द पोलीसही हादरले आहेत.

जुगारी पतीने केली पैशांसाठी पत्नीची विक्रीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती धार जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ३५ किलोमीटर दूर असलेल्या कानवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे, तर त्याची पत्नी इंदूरमध्ये राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, जुगारी पतीने ५० हजार रुपयांचे कर्ज फेडता न आल्याने आपल्याच पत्नीला एका मित्राला विकले. त्या मित्राने महिलेवर बलात्कार केला.

कानवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अभय नीमा यांनी सांगितले की, महिलेने आरोप केला आहे की, "माझा पती जुगारी आहे. या सवयीमुळे त्याचे कर्ज वाढत गेले, त्यामुळे त्याने माझाच सौदा केला."

पतीकडूनच संबंध ठेवण्याची सक्तीपोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितले की, महिलेने आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की, कर्जबाजारी झालेल्या तिच्या पतीने तिला ५० हजार रुपये उधार देणाऱ्या आपल्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यांनी सांगितले की, फरार झालेल्या दोन्ही व्यक्तींचा शोध सुरू करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, जेव्हा पती कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला, तेव्हा त्याने एका मित्राशी सौदा केला आणि कर्ज फेडण्यासाठी आपल्या पत्नीला त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. धारचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) गीतेश कुमार गर्ग यांनी सांगितले, "प्रकरणाचा तपास सुरू आहे. पीडितेचा जबाब इंदूरमध्ये नोंदवला जाईल."

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश