शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या, ठाण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 06:36 IST

shocking incident in Thane : वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती.

ठाणे : सासू-सासऱ्यांपासून वेगळे राहण्याची मागणी करणारी पत्नी अश्विनी (वय १८) हिचा निर्घृण खून करून आकाश समुखराव (२९, रा. वागळे इस्टेट, ठाणे) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (दि. १७) पहाटेच्या सुमारास घडली.वागळे इस्टेट येथील एका पेस्ट कंट्रोल करणाऱ्या खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारा आकाश आणि अश्विनी यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. घरात तिच्या सासू, सासऱ्यांबरोबर होणाऱ्या भांडणांमुळे तिने वेगळे घर घेण्याची मागणी आकाशकडे केली होती. यातूनच या दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. सध्या ते इंदिरानगर येथील घरात एकत्र कुटुंब पद्धतीने वास्तव्य करीत होते. मात्र, रात्री झोपण्यासाठी ते जवळच असलेल्या रूपादेवी पाडा क्रमांक दोन येथील रणजित शिरसाठ या नातेवाइकाच्या घरी जात होते. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता ते या घरी झोपण्यासाठी गेले. मात्र तिथे पुन्हा त्यांचा याच मुद्द्यावरून वाद झाला. दुसऱ्या दिवशी बुधवारी रोजी सकाळी १० वाजले तरी या घरातून काहीच आवाज आला नाही. त्यावेळी त्यांच्या नातेवाइकांनी आणि शेजारच्यांनी या घराच्या मागील बाजूने आत डोकावले. त्यावेळी आकाश एका साडीला गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळला. त्यावेळी या घराच्या छताचा पत्रा उचकटून स्थानिकांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी त्याची पत्नी अश्विनी हीदेखील रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. जवळच लोखंडी हातोडाही होता. तिच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार केल्याचे आढळले. घटनास्थळी पोलीस उपायुक्त विनय राठोड, सहायक पोलीस आयुक्त जयंत बजबळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट देऊन पाहणी केली. 

तपास सुरूश्रीनगर पोलिसांनी आकाशविरुद्ध पत्नीचा खून आणि स्वत: आत्महत्या केल्याचा गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे सहायक पोलीस आयुक्त बजबळे यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारी