शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीची आत्महत्या, २२ दिवसांच्या बाळाचे छत्र हरपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2021 06:14 IST

२२ दिवसांच्या बाळाचे छत्र हरपले

ठळक मुद्देपुष्पाला प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडत गेली. तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथून मुंबईला आणून मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : तालुक्यातील ओझर (कुंडाचापाडा) येथील १८ वर्षीय पुष्पा शैलेश पारधी हिचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली असताना, गरिबीला कंटाळून व लहानग्या बाळाचे संगोपन कसे करायचे, या विवंचनेत मृत पुष्पाचा पती शैलेश (वय २६) याने बुधवारी घराशेजारील झाडाला गळफास लावून घेत जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

पुष्पाला प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव झाल्यामुळे तिची प्रकृती बिघडत गेली. तिला पुढील उपचारासाठी नाशिक येथून मुंबईला आणून मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, २२ ऑक्टोबर रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेचा शैलेशला धक्का बसला. आधीच मजुरी करून गरिबीच्या परिस्थितीत गुजराण करत होता. त्यात लहान बाळाचे संगोपन कसे करायचे, असा गंभीर प्रश्न शैलेशला पडला. अवघ्या २२ दिवसांचा कालावधी उलटत नाही तोच शैलेशने आपली जीवनयात्रा संपवली आहे. 

बाळाचा जन्म होताच आईचे छत्र हरपले, तर अवघ्या २२ दिवसात बापाने गळफास घेतल्यामुळे बापाचे छत्र हरपले. अवघ्या २२ दिवसांच्या बाळाने आई-वडिलांना गमावले आहे. शैलेशचे वडीलही मागील तीन वर्षांपासून क्षयाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत बाळाचे संगोपन कोण करणार, अशी समस्या सध्या गावकऱ्यांना सतावत आहे. 

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारी