शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पती करत होता दुसरं लग्न, पहिली पत्नी मुलीला घेऊन मंडपात पोहोचली आणि....

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 09:27 IST

ही घटना फिरोजपूरच्या गुरूहर सहाय भागातील आहे. रिपोर्टनुसार, बूटा सिंह नावाच्या तरूणाचं लग्न १३ महिन्यांआधी सुनीता नावाच्या एका तरूणीसोबत झालं होतं.

पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका विवाहित व्यक्ती दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात होती. अशात अचानक त्याची पत्नी तिथे पोहोचली आणि तिथे तिने गोंधळ घातला. आरोप आहे की, एक व्यक्ती पत्नी आणि एक मुलगी असून फसवून दुसरं लग्न करत होता.ही घटना फिरोजपूरच्या गुरूहर सहाय भागातील आहे. रिपोर्टनुसार, बूटा सिंह नावाच्या तरूणाचं लग्न १३ महिन्यांआधी सुनीता नावाच्या एका तरूणीसोबत झालं होतं. लग्नानंतर सुनीता आणि बूटा सिंह यांच्यात काही वाद झाला. यानंतर सुनीता सासरच्यांवर मारझोड केल्याचा आरोप लावत माहेरी निघून गेली. तिथेच तिने एका मुलीला जन्म दिला. (हे पण वाचा : जिम ट्रेनरने नाव बदलून केलं लग्न, प्रेग्नन्सीनंतर तरूणी डॉक्टरकडे गेली तेव्हा झाला खुलासा!)

पती बूटा सिंहसोबत वाद मिटवण्यासाठी गावात अनेक पंचायत बोलवलण्यात आल्या. पण दोघांमधील वाद काही मिटला नाही. यादरम्यान सुनीताला माहिती मिळाली की, तिचा पती दुसरं लग्न करतो आहे. ज्यानंतर ती तिच्या नातेवाईकांना घेऊन थेट लग्न मंडपात पोहोचली आणि तिथे गोंधळ घातला.

दुसरीकडे बूटा सिंहचं आधीच लग्न झाल्याचं समजलं तेव्हा मुलीकडच्या लोकांनी ही सोयरीक तोडली आणि त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात असलेल्या बूटा सिंहला पोलिसांनी अटक केली. (हे पण वाचा : महिलेकडून होत असलेल्या सततच्या लैंगिक शोषणाला वैतागून तरूणाचा आत्महत्येचा प्रयत्न!)

नंतर त्याला जामीन मिळाला. यानंतर बूटा सिंहची पहिली पत्नी तिच्या नातेवाईकांसोबत पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. आणि सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करू लागली. पीडिता सुनीताने सांगितले की, बूटा सिंहसोबत तिचं लग्न १६ फेब्रुवारी २०२० मध्ये झालं होतं. मात्र, त्याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याने तो तिला मारहाण करत होता. त्यानंतर त्याने तिला घरातून काढून दिले. 

टॅग्स :PunjabपंजाबCrime Newsगुन्हेगारी