शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

क्रूरतेचा कळस! दारुच्या नशेत पती घरात आला अन् पत्नीसह ३ मुलांवर अ‍ॅसिड फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2020 07:56 IST

शाहिद दररोज आपल्या पत्नीबरोबर भांडत असे. शाहिद (वय ३२) याला अ‍ॅसिडच्या बाटलीसह पकडण्यात आलं.

ठळक मुद्देमद्यधुंद व्यक्तीने आपल्या पत्नीवर आणि तीन मुलांवर अ‍ॅसिड फेकलेअ‍ॅसिड बाटलीसह नवऱ्याला पोलिसांनी अटक केलीदोन मुलांची प्रकृती स्थिर तर पत्नी आणि एक मुलगा गंभीर

नवी दिल्ली – दारुच्या नशेत पतीने पत्नी आणि तीन मुलांवर अ‍ॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यावेळी हा प्रकार घडला तेव्हा पत्नी आणि मुलांच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक त्यांच्या मदतीसाठी धावले. या  चौघांना जगप्रवेश चंद रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं मात्र तेथून त्यांना एम्समध्ये पाठवण्यात आलं आहे.

पोलिसांचा दावा आहे की, शाहिद दररोज आपल्या पत्नीबरोबर भांडत असे. शाहिद (३२) याला अ‍ॅसिडच्या बाटलीसह पकडण्यात आलं. त्यानंतर शास्त्री पार्क पोलिस स्टेशनने आरोपीला न्यायालयात हजर केले असता तिथून त्याला तुरुंगात पाठविले. शाहिद कुटुंबासह शास्त्री पार्कच्या सी-ब्लॉकमध्ये गल्ली नंबर ९ येथे भाड्याच्या घरात राहतो. पत्नी मुमताज(२८)सह त्याला आठ, सहा आणि ४ वर्षाची तीन मुले आहेत.

शाहिद फळांचा व्यवसाय करतो, छोट्या छोट्या गोष्टींवरून पती-पत्नीमध्ये दररोज भांडण होत असे. शाहिदला दारूचे व्यसन आहे. शनिवारी सकाळी ९.३० च्या सुमारास तो बाहेरून मद्यधुंद अवस्थेत घरी आला होता. त्याच्या हातात अ‍ॅसिडची बाटली होती. तो पत्नीशी भांडण करू लागला. तिन्ही निर्दोष मुलंही तिथे उभी होती. दारुच्या नशेत शाहिदचा राग अनावर झाला आणि त्याने पत्नी आणि मुलांवर अ‍ॅसिड फेकले.

या घटनेने पत्ती आणि मुले जोरजोरात ओरडू लागली तेव्हा घरमालक तातडीने त्याठिकाणी पोहचले. रुममधील ते दृश्य पाहून त्यांना धक्का बसला, बाकी लोकांच्या मदतीने शाहिदला पकडण्यात आलं. त्यानंतर पत्नी आणि मुलांना जवळच्या जगप्रवेश चंद रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात हलवलं. सध्या पत्नी मुमताज आणि ४ वर्षाच्या मुलाची प्रकृती गंभीर आहे तर इतर दोघांना रुग्णालयातून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.

टॅग्स :Policeपोलिस