शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याचे सपासप वार; रक्ताच्या थारोळ्यात टाकून पती पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 23:24 IST

गुरुवारी सायंकाळी दोघा पती-पत्नीत काहीतरी कौटुंबिक कारणावरून वाद झाले. त्यातून संशयित आरोपी पती दिपकने पत्नी पूजा हिच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार केले.

नाशिक :  पेठरोडवरील तुळजाभवानी नगर समर्थनगर येथे पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे या घटनेत पूजा दीपक पवार (23) ही गंभीर जखमी झाली असून तिला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पत्नीवर वस्तऱ्याने वार केल्यानंतर संशयित आरोपी पती दीपक पवार याने घटनास्थळावरून पलायन केले. याबाबत रात्री उशिरा पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. महिन्याभरापूर्वी दीपक पवार हा पत्नी पूजा हिच्या समवेत तुळजाभवानी नगर येथील ओम साई निवास येथे राहण्यासाठी आला होता. गुरुवारी सायंकाळी दोघा पती-पत्नीत काहीतरी कौटुंबिक कारणावरून वाद झाले. त्यातून संशयित आरोपी पती दिपकने पत्नी पूजा हिच्या गळ्यावर धारदार वस्तऱ्याने वार केले. त्यानंतर पूजा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद करून पलायन केले. या घटनेनंतर गंभीर जखमी झालेल्या पूजा हिने घराचा दरवाजा वाजवून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला . मात्र कोणी मदतीला न आल्याने तिने एका ओळखीच्या व्यक्तीला फोन करून माहिती दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने व घरमालकाने घराचा दरवाजा उघडला असता पूजा रक्ताच्या थारोळ्यात घरात पडलेली होती. त्यानंतर तिला जखमी अवस्थेत तत्काळ जिल्हा रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल केले.

गळ्यावर वर्मी घाव बसल्याने पुजारी गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते दरम्यान घटनेचे वृत्त समजतात पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक सत्यवान पवार पोलीस हवालदार सुरेश नरवाडे संदीप शेळके व पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलिस फरार संशयितांचा शोध घेत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून