शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर पतीला केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 01:50 IST

चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना पश्चिमेतील जोशीबाग परिसरात बुधवारी घडली.

कल्याण - चारित्र्यावर संशय घेत पत्नीवर चाकूने वार करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना पश्चिमेतील जोशीबाग परिसरात बुधवारी घडली. पत्नीला ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती विकास शिगवण (३२) याला महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे.पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणारा विकास हा पत्नी काजल (२२) हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यावरुन दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादाला कंटाळलेली काजल आपल्या मुलीसोबत जोशीबाग येथील लक्ष्मीबाई परदेशी चाळीमध्ये आईवडिलांकडे राहत होती. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास काजलचे आईवडील कामावर निघून गेले. त्यावेळी, काजल आणि त्यांची मुलगी अशा दोघींच घरी होत्या. हीच संधी साधत घराच्या पाठीमागील दरवाजाने विकास घरात घुसला. घरात येताच त्याने दरवाजाला आतून कडी लावून काजलला कोंडून ठेवले. त्यांनतर सोबत आणलेल्या चाकूने काजलच्या गळ्यावर, छातीवर वार केले.हल्ला वाचविण्याचा प्रयत्न करणाºया काजलच्या हातावरही विकासने वार केले. या घटनेमुळे घाबरलेल्या काजलने घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता विकासने तिच्या पायावर वार केले.‘तुला जिवंत ठेवणार नाही, तू माझी झाली नाही, तर कुणाचीही होऊ देणार नाही’ असे धमकावत त्याने जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी काजलने दिलेल्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी गुन्हा दाखल करून विकास शिगवन याला अटक केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी