वेलतूर (जि. नागपूर) : एकाच कुटुंबातील तिघांनी वैनगंगा नदीतील गाेसे खुर्द प्रकल्पाच्या ‘बॅक वाॅटर’मध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना वेलतूर (ता. कुही) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील आंभाेरा येथे रविवारी दुपारी २ च्या सुमारास उघडकीस आली. मृतांमध्ये पती, पत्नी व मुलीचा समावेश आहे. श्याम नारनवरे (४६), सविता नारनवरे (३५) व समता श्याम नारनवरे (१२, रा. प्लाॅट नं. ११०, अनमाेलनगर, हनुमान मंदिराच्या मागे, वाठाेडा, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. गाेसे खुर्द प्रकल्पाचे ‘बॅक वाॅटर’ वैनगंगा नदीपात्रापासून ५०० मीटर अंतरावर आहे.याप्रकरणी वेलतूर पाेलिसांनी ज्याेती घरत यांच्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे.
पती-पत्नीची मुलीसह गाेसे खुर्द प्रकल्पात आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 05:46 IST