शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

पत्नीनेच फिल्मी स्टाइलने केले पतीचे अपहरण; पोलिसांनी पाठलाग करत ३६ तासांतच केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 07:37 IST

पत्नीसह आठ आरोपींना अटक

उरण : प्राॅपर्टीच्या वादातून व पत्नीला सोडून दुसऱ्या महिलेसोबत मौजमजा करणाऱ्या पतीलाच संतप्त झालेल्या पत्नीनेच सहकाऱ्यांच्या मदतीने  फिल्मी स्टाइलने अपहरण केल्याची घटना न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अपहरणाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ३६ तासांतच शिताफीने तपास करीत गोव्यातून तीन महिलांसह पाच जणांना अटक करून अपहरण झालेल्या पतीची पोलिसांनी सुखरूपपणे सुटका केली आहे.

विजयाराजन चेट्टीयार (४५) हे मूळचे तामिळनाडूमधील रहिवासी आहेत. त्यांची विजय राजन बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स नावाची कंपनी असून नवी मुंबई सीवूड येथे त्यांचे कार्यालय आहे. तसेच नवी मुंबईतच ते मागील काही वर्षांपासून वास्तव्यास आहेत. त्यांची पत्नी अलगू मीनाक्षी विजयाराजन चेट्टीयार ही तामिळनाडू येथेच राहते. पती-पत्नीत छोट्या मोठ्या गोष्टींसाठी व मालमत्तेसाठी वादविवाद होत होते. पती-पत्नीत बेबनाव निर्माण झाल्याने अखेर त्यांनी तामिळनाडू येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.

घटस्फोटाच्या अर्जावर अद्यापही न्यायालयाने निकाल दिलेला नाही; मात्र मालमत्तेचा वाद संपुष्टात आलेला नसतानाही आणि घटस्फोटाचा न्यायालयात खटला सुरू असतानाही विजयाराजन हे एका महिलेसोबत रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची कुणकुण पत्नी अलगू मीनाक्षी हिला लागली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या पत्नीनेच आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पतीचे अपहरण करून अद्दल घडविण्यासाठी कट रचला. मीनाक्षी हिने नवी मुंबई गाठली. आपल्या दोन महिला सहकारी नागेश्वरी मुरुगन आसारी आणि रिहाना अन्सर भाषा यांना मालमत्ता खरेदी करण्याच्या नावाखाली बनावट गिऱ्हाईक बनवून पती विजयाराजन यांच्या सीवूड येथील कार्यालयात पाठविण्यात आले.

प्राॅपर्टी दाखविण्यासाठी विजयाराजन हे उलवे येथील खारकोपर येथे दोन महिलांना घेऊन आले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या अपहरणकर्त्यांनी दोन महिलांच्या मदतीने विजयाराजन यांचे अपहरण करून गोव्याच्या दिशेने गाडीतून पलायन केले. ऑफिस बंद होण्याची वेळ झाली तरी विजयाराजन परतले नाहीत. तसेच उशिरापर्यंत घरी परत न आल्याने अखेर दुसऱ्या दिवशी न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. न्हावा-शेवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडलेल्या अपहरणाची तक्रार दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी सपोनि एस. बी. निकम, पोलीस हवालदार व्ही. व्ही. शिंदे, वैभव शिंदे, पोलीस नाईक संजय सपकाळ, गणेश सांबरे, विकास जाधव आदी सहकाऱ्यांसह दोन पथके तयार करून घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे माहिती समोर

परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासताना जीपमधून विजयाराजन यांचे अपहरण झाल्याची माहिती पुढे आली. विजयाराजन यांचा मोबाइल नंबरवरून मिळालेले लोकेशन आणि तांत्रिक बाबींचा आधार घेऊन केलेल्या तपासणीत अपहरणकर्ते पीडित व्यक्तीला कलिगुंट-गोवा येथे घेऊन गेल्याचे निदर्शनास आले. न्हावा-शेवा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खासगी वाहनाने लागलीच गोवा गाठले. पुन्हा महाराष्ट्राच्या दिशेने निघालेल्या अपहरणकर्त्याची जीप कणकवली पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी थांबताच पोलीस पथकांनी अपहरणकर्त्यावर झडप घालून जेरबंद केले. गाडीत बांधून ठेवलेल्या पीडिताचीही अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली.

टॅग्स :Kidnappingअपहरण