शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

हाताने गळा आवळलाच नाही, मग ४ वर्षीय मुलाला संपवलं कसं?; पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये नवी माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 12:11 IST

मुलाच्या शरीरावर ओरखड्याच्या खुणाही नाहीत, असं निरीक्षण डॉक्टरच्या पथकाने नोंदवलं आहे.

Goa Murder Case ( Marathi News ) : पतीला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने आर्टिफिशयल इंटेलिजेंस कंपनीची सीईओ असणाऱ्या आईने टोकाचे पाऊल उचलत आपल्याच चार वर्षांच्या मुलाचा खून केला. सूचना सेठ (रा. बंगळुरू) असे या महिलेचे नाव असून ती माइंडफुल एआय लॅबची संस्थापक आहे. आई व मुलाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या व हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेमुळे गोव्यासह राष्ट्रीय पातळीवर हळहळ व्यक्त केली जात आहे.

बाळाला संपवल्यानंतर तिने आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. अधिकृतरित्या मात्र हे स्पष्ट झालेलं नाही. सिकेरी-कांदोळी येथील हॉटेलचा स्टाफ, गोवा पोलिसांची सतर्कता व टॅक्सी चालकामुळे या खुनाचा छडा लागला, आपल्या चार वर्षाच्या बाळाला मारण्यासाठी आरोपी महिलेने उशीचा वापर केल्याची शक्यता आहे. शवचिकित्सा अहवातून हे स्पष्ट झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

बाळाला मारण्यासाठी केला उशीचा वापर

पोस्टमार्टमनंतर डॉ. कुमार नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचा गळा दाबल्याच्या स्पष्ट खुणा आहेत. त्यासाठी तिने उशी वापरली असावी. मुलाच्या मृत्यूला ३६ तासांपेक्षा जास्त काळ झाला आहे. दुखापतीच्या किंवा झटापटीच्या खुणा नाहीत. ही सर्व गळा दाबण्याची चिन्हे आहेत. अंदाजे ३६ तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. गळा दाबल्यानंतर श्वास कोडला गेल्यामुळे रक्तस्त्राव झाला आहे आणि नाकाला सूज आली आहे. शरीरावर ओरखड्याच्या खुणाही नाहीत, असे निरीक्षण डॉक्टरच्या पथकाने नोंदवलं आहे.

अशी जाळ्यात अडकली 'सूचना'

सूचना व पती व्यंकटरमन यांचा २०१० मध्ये विवाह झाला, २०१९ मध्ये त्यांना मुलगा झाला. मात्र, मुलगा झाल्यानंतर एका वर्षातच म्हणजे २०२० मध्ये त्या दोघात वाद सुरू झाले. त्यांचे भांडण कोर्टात गेले व दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला, कोर्टाने वडिलांना दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र, कोर्टाचा निर्णय सूचनाला पटला नव्हता. पती व्यंकटरमन याने मुलाला भेटूच नये, असे तिला वाटत होते. त्यासाठी तिने प्लॅन केला आणि पोटच्या मुलाला कायमचे संपवले. सोमवारी सुटकेसमध्ये मृतदेह घालून ती पुन्हा बंगळुरुच्या दिशेने टॅक्सीद्वारे निघाली. निघताना महिलेसोबत मुलगा नसल्याचे पाहून रिसॉर्टमधील रूमबॉयला संशय आला, थोड्या वेळाने तो रूममध्ये गेला असता त्याला रक्ताचे डाग दिसले. त्याने तत्काळ व्यवस्थापकाला माहिती दिली असता त्यानेही वेळ न दवडता पोलिसांना कळवले. पोलिसांनी तपास चक्रे गतिमान करत सूचना ज्या टॅक्सीने गेली त्या टॅक्सीचालकाच्या मदतीने तिला चित्रदुर्गजवळील अयमंगला पोलिसांनी तिला अटक केली.   

टॅग्स :goaगोवाCrime Newsगुन्हेगारी