शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
2
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
3
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
4
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
5
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
6
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
7
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
8
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
9
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
10
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
11
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
12
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
13
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
14
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
15
Shani Dev: शनिशिंगणापुरला शनि मंदिराचा चौथरा आहे पण छप्पर नाही; असे का? जाणून घ्या कारण...
16
IPL 2025: रोहित शर्माचा धमाका! Mumbai Indiansमधून 'असा' विक्रम करणारा केवळ दुसराच
17
IPL 2025 : MS धोनीच्या CSK संघात बदल! MI च्या संघातून खेळलेल्या 'बेबी एबी'वर खेळला मोठा डाव
18
Astro Tips:थाटामाटात लग्न करून वर्षभरात होणारे घटस्फोट थांबवण्यासाठी 'हे' मुद्दे वेळीच लक्षात घ्या!
19
“हिंदू, हिंदी, हिंदूराष्ट्र लादण्याचा BJPचा अजेंडा, भाषेची सक्ती रद्द करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  

गुन्हे घडतायत तरी किती? राज्यातील आठ कारागृहे हाऊसफुल्ल; मुंबई, ठाण्यात सर्वाधिक कैदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 05:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यभरातील ६० कारागृहांपैकी ८ कारागृहे हाऊसफुल झाली आहेत. यामध्ये मुंबई ठाण्यातील कारागृहात सर्वाधिक कैदी ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यभरातील ६० कारागृहांपैकी ८ कारागृहे हाऊसफुल झाली आहेत. यामध्ये मुंबई ठाण्यातील कारागृहात सर्वाधिक कैदी असल्याचे कारागृह विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. मुंबईच्या कारागृहात क्षमतेपेक्षा तिप्पट तर ठाण्याच्या कारागृहात चौपट कैदी आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनावरचा ताण वाढताना दिसत आहे. दुसरीकडे हाच ताण कमी करण्यासाठी कारागृह विभागाकडून नवीन कारागृहाच्या उभारण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे.

महाराष्ट्रात किती कारागृहमहाराष्ट्रात एकूण ६० कारागृहे असून त्यामध्ये मध्यवर्ती (९), जिल्हा (२८), विशेष कारागृह रत्नागिरी (१), मुंबई जिल्हा महिला (१), किशोरीर सुधारालय नाशिक (१), खुले (१९) तर खुली वसाहत (१) यांचा समावेश आहे.

वकील नेमण्यासाठी, जामिनासाठी पैसे नाहीत म्हणून...कारागृहातील बऱ्याच क़ैद्यांकडे वकील नेमण्यासाठी, जामिनासाठी पैसे नाहीत म्हणून त्यांना कारागृहातच कैद राहावे लागत आहे. त्याचाही कारागृह प्रशासनावर ताण वाढताना दिसत आहे. यासाठी कारागृह विभागाने गरीब कैद्यांना जामिनासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहे.

न्यायाधीन कैद्यांची गर्दी जास्त...महाराष्ट्रातील एकूण कारागृहात कैद्यांची क्षमता २६ हजार ३७७ असताना ३१ जानेवारी २०२४ पर्यंत ४० हजार ४८५ कैदी आहे. यामध्ये  ३८ हजार ८५७ पुरुष कैद्यांसह १६०६ महिला तर २२ तृतीयपंथी कैद्यांचा समावेश आहे. यामध्ये सिद्धदोष (७८५०), न्यायाधीन (३२,२१५) तर स्थानबद्ध इतर (४२० ) प्रकारच्या कैदी आहे.

या आठ कारागृहांमध्ये सर्वाधिक कैदीकारागृह      बंदीक्षमता     प्रत्यक्ष संख्याकल्याण जिल्हा वर्ग १    ५४०     २१९१ ठाणे मध्यवर्ती    ११११               ४१८४ मुंबई मध्यवर्ती     ९९९                ३७२२ बुलढाणा जिल्हा वर्ग २    १०१                  ३५४ सोलापूर     १४१                  ४६२ नांदेड जिल्हा वर्ग २    २०४                 ६०१ जळगाव जिल्हा २    २००                ५२० येरवडा मध्यवर्ती     २७५२      ६५२५ 

टॅग्स :jailतुरुंग