शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रग्ज तस्करीत उच्चभ्रू घरातील गृहिणी; वर्षभरात २३० जणांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 06:52 IST

Drug trafficking : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करीसाठी आधीपासून महिलांचा वापर करण्यात येत आहे. यात उच्चभ्रू घरातील गृहिणीही सहभाग घेत असल्याने ही चिंतेची बाब झाली आहे.

- मनीषा म्हात्रे

मुंबई :  झटपट पैसे कमाविण्यासाठी उच्चभ्रू घरातील गृहिणीचा ड्रग्ज तस्करीत कल वाढत असल्याचे धक्कादायक चित्र केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाच्या (एनसीबी) कारवाईतून समोर येत आहे. एनसीबीने,  वर्षभरात २३० जणांवर कारवाई करत, १ हजार ७९१ किलो ड्रग्ज जप्त केले. या आरोपींमध्ये १५ महिला आहेत. 

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करीसाठी आधीपासून महिलांचा वापर करण्यात येत आहे. यात उच्चभ्रू घरातील गृहिणीही सहभाग घेत असल्याने ही चिंतेची बाब झाली आहे. १० ते १५ टक्के महिला तस्कर आहेत. या महिलांविरुद्ध कारवाई करताना यंत्रणांसमोर अडचणी येत आहेत. 

कारवाईपासून वाचण्यासाठी मुलाचा घेतला आधार...नागपाडा येथील रहिवासी हुसेन बीकडून (४१) हिच्याकडून एनसीबीने जुलै महिन्यात १.८ किलो ड्रग्जचा साठा जप्त केला होता. कुणाला संशय येऊ नये म्हणून हुसेन ही १३ वर्षाच्या मुलाचा या कामात वापर करत होती. 

अँफेटामाइनची परदेशात ओढ... अँफेटामाईनची दुबई, मालदीव ऑस्ट्रेलियामध्ये क्रेझ वाढत असल्याचेही एनसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे. 

मुंबईत मोठ्या प्रमाणात हे ड्रग्ज तयार करून त्याची विक्री करण्यात येत असल्याचे एनसीबीच्या कारवाईतून समोर आले आहे. 

ड्रग्ज तस्करीचा बदलता ट्रेण्ड... एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षभरात कुरिअरद्वारे ड्रग्ज तस्करीवर भर दिल्याचे पाहावयास मिळाले. त्यात कुरियर कंपनीद्वारे पाठविण्यात येणाऱ्या ड्रग्ज पार्सलवरील नाव, पत्ता बनावट असल्याचेही तपासात समोर आले आहे तसेच कुणाच्याही लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने हे ड्रग्ज लपविण्यात आले होते.  या रॅकेटमध्ये कुरियर कंपन्याचा सहभाग आहे का, याबाबत अधिक तपास सुरू आहे.

गुजरातमधून अटक १० सप्टेंबर : एनसीबीने गुजरातमधून रूबिना शेखला अटक केली. जुलैपासून ती एनसीबीच्या रडारवर होती.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी