शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

घरगड्यांनी जेवणातून गुंगीचे औषध देऊन लंपास केला सव्वातीन लाखांचा ऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 17:26 IST

जेवणातून काहीतरी गुंगीचे औषध दिले..

पिंपरी : जेवणातून काहीतरी गुंगीचे औषध दिले. घरातील व्यक्ती बेशुध्द झाल्यानंतर सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा ३ लाख ३० हजारांचा ऐवज चोरून नेला. पिंपरीतील महेशनगर येथे मंगळवारी (दि. ११) हा प्रकार घडला. घरकाम करणाऱ्या दोघांविरूध्द पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गीता (वय ३०), महेश (वय ४०, दोघेही रा. नेपाळ, दोघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहित नाही) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्राची दीपक नेरकर (वय २१, रा. महेशनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे.आरोपी गीता आणि महेश फिर्यादी प्राची यांच्या राहत्या घरी घरकाम करण्याची नोकरी करतात. आरोपी गीता आणि महेश यांनी चोरीच्या उद्देशाने मंगळवारी जेवणात काहीतरी गुंगीचे औषध मिसळले. फिर्यादींचे वडील दीपक, आजोबा काशिनाथ व आजी सुमन यांना गुंगीचे औषध मिसळलेले जेवण दिले. त्यामुळे वडील दीपक, आजोबा काशिनाथ आणि आजी सुमन बेशुध्द झाले. त्यानंतर आरोपी गीता आणि महेश यांनी घरातून सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा ३ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस