शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक घर चार जणांना विकले, पैसे घेऊन बिल्डर फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 01:29 IST

वांगणी गावातील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या इमारतीमधील एकच फ्लॅट तीन ते चार जणांना विकून पोबारा केला आहे.

बदलापूर : वांगणी गावातील एका बांधकाम व्यावसायिकाने आपल्या इमारतीमधील एकच फ्लॅट तीन ते चार जणांना विकून पोबारा केला आहे. त्यात त्याने आपल्या जवळच्या नातेवाइकांचीही फसवणूक केली आहे. याप्रकरणी बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वांगणी परिसरात रऊ फ शेख या बांधकाम व्यावसायिकाने इमारतीचे बांधकाम केले असून या इमारतीमधील एकच फ्लॅट तीन ते चार जणांना विकला आहे. त्याच्या या कृतीमुळे अनेकांची घरे अडचणीत सापडली आहेत. फ्लॅट विकत घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने आपल्या फ्लॅटला कुलूप लावल्याने एकाच फ्लॅटच्या दरवाजाला तीन कुलुपे लावल्याचेही दिसत आहे. त्यातील एक ग्राहक म्हणजे नाजिया शेख. शेख यांनी टप्प्याटप्प्याने रऊफ याला पाच लाख दिले. मात्र, फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करत नसल्याने त्यांनी त्याच्याकडे तगादा लावला. तरीही, तो प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी रऊफ याच्याविरोधात तक्रार केली.पोलिसांनीही या प्रकरणाची माहिती घेतल्यावर त्या बांधकाम व्यावसायिकाने एकच फ्लॅट तीन ते चार जणांना विकल्याचे समोर आले आहे.सीमा शेख यांनीही फ्लॅट बुक केला. मात्र, त्यांच्या फ्लॅटला तीन कुलूप लागल्याने हा फ्लॅट तीन जणांना विकल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेने खळबळ उडाली आहे. वांगणीत अनेक बांधकाम प्रकल्प सध्या सुरू आहेत.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी