उल्हासनगर - पोलिसांच्या त्रासाला कंटाळून हॉटेल व्यावसायिक सतीश खेडकर यांनी गुरुवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलीस शिपाई पवन केदार यांच्यावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी कुटुंबाने केली.कॅम्प नं.-१७, सेक्शन परिसरात खेडकर यांनी चायनीज हॉटेल सुरू केले होते. २४ एप्रिल व २ मे रोजी मध्यवर्ती पोलिसांनी हॉटेलवर केस केली. तसेच पवन केदार या पोलीस शिपायाने दरमहा १० हजारांचा हप्ता मागितला. वारंवार केसेस करून दरमहा हप्ता मागितल्याच्या त्रासाला कंटाळून खेडकर यांनी गुरुवारी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. खेडकर यांच्या कुटुंबाने केदार याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर, मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी शुक्रवारी केदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.
पोलिसांच्या त्रासाने हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2019 05:23 IST