शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
3
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
4
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
5
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
6
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
7
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
8
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
9
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
10
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
11
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
12
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
13
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
14
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
15
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
16
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
17
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
18
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
19
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
20
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश

भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 08:46 IST

मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातून भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे.

मध्य प्रदेशमधील गुना जिल्ह्यातून भाजप नेत्याच्या गुंडगिरीचा एक अत्यंत क्रूर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. गणेशपुरा गावात भाजप पदाधिकारी महेंद्र नागर याने जमीन वादातून एका शेतकऱ्याची थार गाडीखाली चिरडून निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या शेतकऱ्याच्या मुलींसोबतही आरोपी नागर याने अमानुष वर्तन केले आणि त्यांचे कपडे फाडले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी मुख्य आरोपीसह १४ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

फतेहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेशपुरा गावात ही हादरवणारी घटना घडली. शेतकरी रामस्वरूप धाकड आपल्या पत्नीसह शेतात जात असताना, भाजप नेता महेंद्र नागर आणि त्याच्या साथीदारांनी त्यांना अडवले. जमिनीच्या जुन्या वादातून नागरने आधी रामस्वरूप धाकड यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाल्यानंतर नागर याने क्रौर्याची सीमा ओलांडली आणि त्यांच्या अंगावर आपली महिंद्रा 'थार' गाडी चढवली.

या भयानक कृत्यानंतर रामस्वरूप यांच्या मुली जेव्हा मदतीसाठी धावल्या, तेव्हा आरोपी महेंद्र नागरने त्यांच्यावरही हल्ला केला. त्याने मुलींना मारहाण केली, त्यांचे कपडे फाडले आणि दहशत निर्माण करण्यासाठी हवेत गोळीबारही केला. जखमी शेतकरी रामस्वरूप यांना तब्बल एक तास उपचारासाठी गावाबाहेर नेऊ दिले गेले नाही. अखेर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

छोट्या शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणारा 'आतंक'पोलिसांच्या माहितीनुसार आणि पीडित कुटुंबाच्या आरोपांनुसार, आरोपी महेंद्र नागर हा परिसरात 'दहशत' माजवण्यासाठी ओळखला जातो. तो लहान शेतकऱ्यांना धमकावून त्यांच्या जमिनी बळकावतो. त्याच्या दहशतीमुळे जवळपास २५ शेतकऱ्यांनी जमिनी विकून गाव सोडल्याचे सांगितले जात आहे. रामस्वरूप धाकड यांनी नागरच्या या दादागिरीला विरोध केल्यामुळे त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे विरोधी पक्षांनी भाजप नेत्यांची गुंडगिरी वाढल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी महेंद्र नागर आणि त्याच्या कुटुंबातील तीन महिलांसह एकूण १४ लोकांविरोधात खुनाचा (कलम ३०२) गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Leader Crushes Farmer, Assaults Daughters in Land Dispute

Web Summary : Madhya Pradesh: BJP leader allegedly ran over a farmer in a land dispute, assaulting his daughters. Accused and 14 others booked for murder. Tension grips the area.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश