शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; पाच दिवसांनी समजले

By उद्धव गोडसे | Updated: November 13, 2023 14:56 IST

शिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकले, पन्हाळा तालुक्यातील राक्षी येथील घटनेचा पाच दिवसांनी उलगडा, सहा संशयित ताब्यात

- सरदार चौगुले

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या सख्ख्या भावांचा डुकरांच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाला. राक्षी (ता. पन्हाळा) येथे बुधवारी (दि. ८) रात्री घडलेल्या दुर्घटनेचा सोमवारी (दि. १३) सकाळी उलगडा झाला. शिकारीसाठी तारा लावून मृतदेहांची विल्हेवाट लावणा-या सहा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पन्हाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून, मृतदेहांचा शोध सुरू आहे. जोतिराम सदाशिव कुंभार (वय ६४) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय ६०, दघे रा. राक्षी) अशी मृतांची नावे आहेत.

पन्हाळा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जोतिराम आणि नायकू हे दोघे बुधवारी रात्री खेकडे पकडण्यासाठी धरणाचा ओढा परिसरात गेले होते. रात्री उशिरापर्यंत ते परत आले नाहीत. दुस-या दिवशी मुलांनी ओढ्यालगत शोध सुरू केला. ड्रोनने शोध घेऊनही कुंभार बंधूंचा मागमूस मिळाला नाही. त्यानंतर नातेवाईकांनी दोघे बेपत्ता असल्याची फिर्याद पन्हाळा पोलिस ठाण्यात दिली. तपास सुरू असताना धरणाचा ओढा परिसरात गावातील काही लोकांनी डुकरांच्या शिकारीसाठी विद्युत तारा लावल्या होत्या अशी माहिती पन्हाळा पोलिसांना मिळाली. 

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, कुंभार बंधूंचा तारांना स्पर्श होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आले. शिकारीसाठी तारा लावणा-या सहा जणांनी घाबरून कुंभार बंधूंचे मृतदेह जवळच्या जंगलात फेकले आहेत. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने मृतदेहांचा शोध सुरू आहे. या घटनेने पन्हाळा परिसरात खळबळ उडाली असून, राक्षी येथील ग्रामस्थांनी पन्हाळा पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी