शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भोसरीत पोटच्या तीन मुलांना गळफास लावून महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 21:19 IST

भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्दे फातिमा यांनी घरातील छताच्या हुकाला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यांनी दुसऱ्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. 

पिंपरी - कामाच्या शोधात भोसरीमध्ये आलेल्या कामगार कुटुंबातील महिलेने स्वत:च्या पोटच्या तीन मुलांना गळफास लावून स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. भोसरी येथे रविवारी (दि. २८) दुपारी चारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फातिमा अक्रम बागवान (वय २८), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय ९), झोया अक्रम बागवान (वय ७), मुलगा जिआन अक्रम बागवान (वय ६) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी फातिमा यांचा पती अक्रम बागवान याने पोलिसांना माहिती दिली. बागवान कुटुंब चार दिवसांपूर्वी कामाच्या शोधात भोसरी येथे आले. काम शोधण्यासाठी अक्रम बागवान रविवारी (दि. २८) सकाळी साडेदहाच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यानंतर घरात असलेल्या त्यांच्या पत्नी फातिमा यांनी घरातील छताच्या हुकाला तिन्ही मुलांना नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास लावला. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अक्रम बागवान दुपारी चारच्या सुमारास घरी आले. घर आतून बंद असल्याने त्यांनी बराच वेळ दार वाजवले. मात्र दार कुणीही उघडले नाही. त्यामुळे त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दार तोडून घरात प्रवेश केला असता चौघांचे मृतदेह आढळले. त्यानंतर चौघांचे मृतदेह वायसीएम रुग्णालयात शवविच्छेनासाठी हलविण्यात आले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत. बागवान यांनी भोसरी येथे आल्यानंतर एका शाळेत मुलांना प्रवेश घेतला. मुलगी अलफिया चौथीत, झोया दुसरीत आणि मुलगा जिआन पाहिलीत शिकत होते.

कर्जबाजारीपणामुळे नैराश्यबागवान कुटुंब मूळचे कर्नाटकमधील बसव कल्याण येथील आहे. अक्रम बागवान फळ विक्रीचा व्यवसाय करतात. वारजे येथे व्यवसाय करताना त्यांना नुकसान झाले. त्यानंतर हे कुटुंब तळेगाव दाभाडे येथे गेले. तेथेही त्यांना व्यवसायात यश आले नाही. त्यामुळे ते कुटुंब कर्जबाजारी झाले. तसेच फातिमा यांच्या वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे फातिमा यांना नैराश्य आले. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसbhosariभोसरी