शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमत कशी झाली? तमिळनाडूत इंजिनिअर तरुणाची भररस्त्यात हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 18:49 IST

तमिळनाडूमध्ये दुसऱ्या जातीच्या मुलीसोबत प्रेम केल्यामुळे एका इंजिनिअर तरुणाची हत्या करण्यात आली.

Tamil Nadu Crime: तमिळनाडूत ऑनर किलिंगची हादरवणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या दलित सॉफ्टवेअर इंजिनिअरची उच्च जातीतील मुलीवर प्रेम केल्यामुळे हत्या करण्यात आली. मुलीच्या भावाने तरुणाला रस्त्यात गाठत त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले ज्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. तू खालच्या जातीचा असून माझ्या बहिणीवर प्रेम करायची तुझी हिंमतच कशी झाली? असं म्हणत मुलीच्या भावाने सॉफ्टवेअर इंजिनिअरवर हल्ला केला होता.

२७ जुलै रोजी तामिळनाडूमध्ये दलित तरुणाची त्याच्या प्रेयसीच्या भावाने दिवसाढवळ्या हत्या केली. मृतक २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर कविन सेल्वा गणेशची भररस्त्यात हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर, आरोपी स्वतः पोलिसांसमोर शरण गेला. पोलिस आणि कविनच्या कुटुंबीयांनी हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे म्हटलं. कवनिच्या प्रेयसीच्या कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते अशी माहिती समोर आली. त्यामुळेच कवीनच्या प्रेयसीच्या भावानेच कोयत्याचे वार करुन त्याची हत्या केली.

कविन सेल्वा गणेश हा तुतीकोरिन जिल्ह्यातील अरुमुगमंगलम गावचा रहिवासी होता आणि चेन्नईतील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. तो शालेय जीवनापासूनच एका मुलीच्या प्रेमात होता. कविन आणि त्याच्या प्रेयसीची जात वेगवेगळी होती. कविनची हत्या करणाराआरोपी २१ वर्षीय सुरजित हा त्याच्या प्रेयसीचा भाऊ आहे. मुलीचे कुटुंबिय पोलिसात आहे. मुलीच्या कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते कारण ते एकाच जातीचे नव्हते. मुलीच्या पालकांनी कविनला अनेक वेळा धमकीही दिली होती.

कविनच्या आईच्या तक्रारीनुसार, रविवारी कविन त्याच्या आजोबांच्या तब्येतीबद्दल मुलीला माहिती देण्यासाठी गेला होता. सुरजीतही तिथे होता. त्याने कविनला माझ्या पालकांना तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून सोबत नेले. कविनने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तो त्याच्यासोबत गेला. पण सुरजीतने अचानक बाईक मध्येच थांबवली. मग तो मोठ्याने ओरडू लागला की दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम करण्याची तुझी हिंमत कशी होऊ शकते? यानंतर, सुरजीतने कोयता काढून कविनवर हल्ला केला. कविनने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण सुरजीतने त्याचा पाठलाग केला आणि रुग्णालयापासून सुमारे २०० मीटर अंतरावर त्याला ठार मारले. सुरुवातीला तो घटनास्थळावरून पळून गेला मात्र नंतर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

दरम्यान, पोलिसांनी सुरजीतला अटक केली आहे. त्याच्यावर आणि त्याच्या पालकांवर बीएनएस तसेच एससी/एसटी कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूCrime Newsगुन्हेगारी