शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
2
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
4
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
5
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
6
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
7
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
8
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
9
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
10
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
11
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
12
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
13
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
14
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
15
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
16
दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
17
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
18
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
19
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
20
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स स्कँडलमधील युवतीने तेल्हाऱ्यातील व्यापाऱ्यावर रचला हनीट्रॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2020 20:41 IST

sex scandal trap : स्थानिक गुन्हे शाखेने केला पर्दाफाश, सोने चांदीचे दागीने पळविणाऱ्या दोन युवती अटकेत

ठळक मुद्देव्यापाऱ्याने बदनामीच्या भितीपोटी हनीट्रॅप लपवीत गांधीग्रामजवळ लुटमार झाल्याची तक्रार दहीहांडा पोलिस ठाण्यात दिली.

अकोला : राज्यभर गाजलेल्या सेक्स स्कँडलमधील युवतींनी तेल्हारा येथील एका व्यापाऱ्याला हनीट्रॅपमध्ये ओढून त्यांच्यासोबत रात्र घालवल्यानंतर व्यापारी परत जाण्यासाठी निघाला असता या युवतीने बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देत व्यापाऱ्याच्या अंगावरील सोने व चांदीचे दागीने पळविल्याचा धक्कायदायक प्रकार उघडकीस आला. व्यापाऱ्याने बदनामीच्या भितीपोटी हनीट्रॅप लपवीत गांधीग्रामजवळ लुटमार झाल्याची तक्रार दहीहांडा पोलिस ठाण्यात दिली. मात्र स्थानीक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत हनीट्रॅपमधील दोन्ही युवतींना अटक करत या प्रकरणाचा पर्दाफाश केला. तेल्हारा येथील व्यापारी अजय वर्मा यांनी 28 सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता गांधीग्रामवरुन जात असताना चार अज्ञात इसमांनी मारहाण करून लुटल्याची तक्रार दहीहांडा पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी वर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुध्द भारतीय दंड विधानाच्या कलम 394 (34) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. अजय वर्मा यांच्याकडून घटनेची माहिती घेण्यात येत असतांनाच ते चुकीची माहिती देउन काही माहिती लपवीत असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. त्यामुळे पोलिसांनी या गुंतागुंतीच्या प्रकरणातील मुळ मुद्दयाला हात घालताच वर्मा यांनी सत्य सांगण्यास सुरुवात केली. त्यानुसार अकोल्यातील राज्यभर गाजलेल्या सेक्स स्कॅन्डल प्रकरणातील स्विटी नामक तरुणीला भेटण्यासाठी व्यापारी अकोला येथे आला होता. 

पाकिस्तानच्या Whats App ग्रुपवर लष्करी हद्दीचे छायाचित्रे टाकणारा परप्रांतीय ताब्यात

 

आकोट रोडवरील पाचमोरी येथील एका प्रतिष्ठीत व्यक्तीच्या शेतात तरुणी व तिच्यासोबत आलेली एक महिला यांची वर्मा यांच्यासोबत शेतातील फार्म हाउसवर गाठ-भेट झाली. त्यांच्यातील मधुर भेट आटोपल्यानंतर व्यापारी वर्मा तेल्हारा जाण्यासाठी निघाला असता दोघींनी त्याला अडवत त्याच्या जवळील सोने आणि रोख मागितली. अन्यथा बलात्कार केल्याची तक्रार देण्याची धमकी दिली. दोन्ही महिलेच्या धमकीला घाबरून वर्माने अंगावरील तेरा ग्राम सोन्याचे दागिने व रोख महिलांच्या स्वाधीन करून घराकडे निघाला. मात्र या प्रकरणाचा भंडाफोड होईल या भीतीने त्याने चार अज्ञातांनी लुटल्याची बनावट तक्रार दिली. मात्र स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख शैलेष सपकाळ यांनी या प्रकरणाचा काही तासातच छडा लावत अजय वर्मा यांच्या कबुलीजबाबवरून स्विटी नामक तरुनी व एका महिलेस अटक केली. दोन्ही महिला हनीट्रॅपमध्ये सराईत असून लोकांना गंडविण्याचा त्यांचा व्यवसायच असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा प्रकारे लुटमार झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटArrestअटकAkolaअकोलाPoliceपोलिस