शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"मी तोंड उघडलं तर..."; 18 आमदार, 3 मंत्र्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या 'तिने' दिला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 15:34 IST

मुख्य आरोपी अर्चना नागने केलेल्या दाव्याने राजकारणातील अनेक मंडळींची झोप उडाली आहे.

ओडिशामध्ये हनीट्रॅपमुळे सुरू झालेला वाद आता थांबताना दिसत नाही. काही महिन्यांपूर्वीच ओडिशातील चित्रपट निर्माता अक्षय परीजा याने एका जोडप्यावर गंभीर आरोप केले. आपल्याला हनीट्रॅपमध्ये अडकवल्याचा दावा केला. या जोडप्याने ओडिशातील नेत्यांना, मंत्र्यांना आणि इतर मोठ्या अधिकाऱ्यांना फसवलं आहे. आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. हनीट्रॅप प्रकरणातील आरोपी अर्चनाने मी तोंड उघडलं तर ओडिशामध्ये सगळं काही बदलेलं, असा धमकीवजा इशारा दिला आहे. 

हनीट्रॅपमुळे ओडिशाच्या राजकारणात वादळ आणणाऱ्या जोडप्याची चौकशी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुरू केली आहे. मुख्य आरोपी अर्चना नागने केलेल्या दाव्याने राजकारणातील अनेक मंडळींची झोप उडाली आहे. मला चुकीच्या पद्धतीने अडकण्यात आलं आहे. मी तोंड उघडलं तर राज्यात मोठं परिवर्तन होईल, असा सूचक इशारा तिने दिला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 आमदार, 3 मंत्री, अनेक मोठे अधिकारी आणि प्रसिद्ध व्यक्तींना अर्चना नागने जाळ्यात ओढलं. 

अर्चनाने ओडिशा पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. ओडिशा पोलिसांनी मला चुकीच्या पद्धतीनं पोलीस ठाण्यात 60 तासांहून अधिक वेळ ताब्यात ठेवलं. या; दरम्यान माझा मानसिक छळ केला. माझ्या वृद्ध आई वडिलांना भेटायची परवानगीदेखील दिली नाही, असे आरोप अर्चना नागने केले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. ओडिशाच्या बोलांगीरमध्ये राहणारी अर्चना 2015 मध्ये भुवनेश्वरला पोहोचली. तिने इंटिग्रेटेड लॉ कोर्ससाठी प्रवेश घेतला. 2017 मध्ये अर्चनाची भेट बालासोर जिल्ह्यातील 33 वर्षांच्या जगबंधू चंदशी झाली. 2018 मध्ये त्यांनी लग्न केलं. यानंतर जगबंधूनं वेगळाच उद्योग सुरू केला. तो अर्चनाच्या मदतीने श्रीमंतांना हनीट्रॅप करायचा आणि ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून पैसे उकळायचा. 

जगबंधू त्याच्या संभाव्य सावजांना स्वत:ची ओळख एका प्रमुख राजकीय पक्षाचा सदस्य म्हणून करून द्यायचा. त्यामुळे श्रीमंत उद्योगपती, मंत्री, खासदार, चित्रपट निर्माते यांच्याशी त्याच्या ओळखी झाल्या. दोघे श्रीमंत व्यक्तींना आपल्या घरी बोलवायचे. त्यांना जेवणाचं निमंत्रण द्यायचे. चांगली ओळख झाल्यावर दोघे त्या व्यक्तीला जाळ्यात अडकवायचे. त्यांचे अश्लील व्हिडीओ तयार करायचे. बेडरुममध्ये त्यासाठी त्यांनी स्पाय कॅमेरा लावला होता. पुढे गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन पैसे उकळायचे. अर्चनाने अनेकांना आपल्या जाळ्यात फसवलं. चित्रपट निर्माता अक्षय परीजियालादेखील तिने गळाला लावण्याचा प्रयत्न केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी