शहरं
Join us  
Trending Stories
1
"मातृभाषा आईसारखी, तर हिंदी आपल्या आजीसारखी"; भाषा वादावर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण स्पष्टच बोलले!
2
इराणने 2 आठवड्यात देशाबाहेर काढले 5 लाखहून अधिक अफगाण लोक, समोर आलं धक्कादायक कारण!
3
IND vs ENG 3rd Test Day 2 Stumps : केएल राहुलची फिफ्टी; पंतनंही दिला मोठा दिलासा
4
महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद क्षण! छत्रपती शिवरायांचे १२ किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत, CM फडणवीसांची माहिती
5
Wimbledon Final: जोकोविचचं विक्रमी ग्रँडस्लॅम जेतेपदाचं स्वप्न भंगले; यानिक सिनरनं एकतर्फी मात देत गाठली फायनल
6
गुलमोहर विश्रामगृहात घबाड सापडल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल; अर्जुन खोतकरांच्या पीएसह दोघांवर कारवाई
7
महिलेनं रस्त्याची मागणी केली, खासदार भलतंच बरळले! म्हणाले- "डिलिव्हरीची तारीख सांगा, एक आठवडा आधीच..."
8
IND vs ENG : करुण नायर पुन्हा स्वस्तात खपला! जो रुटनं सुपर कॅचसह द्रविडचा विश्व विक्रम मोडला
9
"संजय शिरसाट यांची विकेट पडावी म्हणून तिन्ही पक्षात..."; भास्कर जाधवांनी व्यक्त केली शंका
10
दिल्ली-हरियाणा भूकंपाच्या धक्क्यांनी पुन्हा हादरलं; सलग दुसऱ्या दिवशी जाणवले भूकंपाचे तीव्र धक्के
11
३० हून अधिक महिलांचे लैंगिक शोषण करणारा 'तो' विभागप्रमुख निलंबित; नाशिक जिल्हा परिषदेत १० वर्षांपासून सुरु होता छळ
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 06:19 IST

याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याच रात्री राहुल आणि सबा सीएच्या घरी थडकले. मुलाच्या समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली. 

मुंबई : ‘आई, मला माफ कर, तुला या वयात एकटे सोडून जातोय...’ वाकोल्यातील एका ३२ वर्षीय चार्टर्ड अकाैंटंटने (सीए) लिहिलेले हे अखेरचे वाक्य. समलैंगिक संबंधांचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्याच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून या तरुणाने आपले जीवन संपवले. धक्कादायक म्हणजे, बदनामीच्या भीतीने त्याने आतापर्यंत ब्लॅकमेलर्सना तब्बल अडीच कोटी रुपये दिले होते. या प्रकरणात वाकोला पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे पण गेल्या काही दिवसांत समलैंगिक संबंधातून आत्महत्या आणि हत्यांच्या घटनांनी मुंबईत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

वाकोला परिसरात ६५ वर्षीय आईसोबत राहणारा हा सीए मुंबईतील एका नामांकित कंपनीत होता. आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सबा कुरेशी आणि राहुल पारवानी या दोघांना अटक केली. घरातील दागिने गायब झाल्याने आईने मुलाकडे चौकशी केली असता, राहुल पारवानीच्या सांगण्यावरून ते गहाण ठेवल्याचे त्याने सांगितले. मुलाने घेतलेली गाडीही पारवानी वापरत होता; पण हप्ते थकल्याने ७ जून रोजी त्याने ती गाडी परत आणली. याबाबत वाकोला पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्याच रात्री राहुल आणि सबा सीएच्या घरी थडकले. मुलाच्या समलैंगिक संबंधाचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्यांनी दिली. 

सप्टेंबर २०२४ मध्ये राहुलशी सीएची इन्स्टाग्रामवरून ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. मात्र, त्यांच्यातील संबंधांनंतर राहुल आणि सबाने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळण्यास सुरुवात केली, असे मुलाने आईला सांगितले. अखेर ६ जुलै रोजी या अत्याचाराला कंटाळून त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या वेगवेगळ्या सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिसांचा कसून  तपास सुरू आहे.

...काकानेच भाच्याला पाजले विष१६ वर्षीय भाच्यासोबत असलेल्या समलैंगिक संबंधातून १९ वर्षीय चुलत काकानेच त्याला कोल्ड्रिंकमधून कीटकनाशक दिल्याचे शिवाजीनगर पोलिसांच्या तपासात नुकतेच उघडकीस आले आहे. दोघांच्या मैत्रीला घरच्यांचा विरोध असल्याने त्यांच्यातील नाते तुटले होते. याच कारणातून त्याने २९ जून रोजी हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

...म्हणून १२ वर्षांच्या मुलाची हत्यावडाळा येथील एका १२ वर्षीय मुलासोबत असलेल्या समलैंगिक संबंधांबाबत वाच्यता होण्याची भीती आरोपी बिपुल सिकारीला (३९) होती. याच भीतीपोटी त्याने त्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचे वडाळा टीटी पोलिसांच्या तपासात समोर आले होते. पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यातून कोरोनाकाळात पॅरोलवर बाहेर आल्यानंतर त्याची वडाळ्यातील या अल्पवयीन मुलासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत होऊन त्यांच्यात समलैंगिक संबंध निर्माण झाले होते. २८ जानेवारी २०२४ रोजी घरी यायला उशीर झाल्यामुळे, घरी आई रागावली तर सर्व काही खरं सांगेन, असे अल्पवयीन मुलाने म्हटले. यामुळे अटकेच्या भीतीने सिकारीने मुलाचा गळा आवळून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली होती.

टॅग्स :Mumbaiमुंबई