शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडे तक्रार दिल्याच्या रागातून महिलेला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 15:39 IST

तू माझ्यावर वाकड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला ना.. आता मी तुला सोडत नाही, असे म्हणून आरोपीने फिर्यादी महिलेस ब्लॉक फेकून मारला.

पिंपरी : पोलिसांकडे तक्रार केल्याचा राग मनात धरून महिलेला मारहाण करून तिच्याकडील मंगळसूत्र रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेल्याचा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. १२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप सुभाष जाधव (वय २५, रा. शुभी मोटर्सच्या बाजूला, वडगाव फाटा, वडगाव, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. काळेवाडीतील एका ४० वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रदीप जाधव यांच्या विरोधात संबंधित महिलेने वाकड पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरून प्रदीप याने २२ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री आठ वाजता पिंपळे सौदागर येथील रोझ व्हॅली सोसायटीत फिर्यादी महिलेस शिवीगाळ केली. तू माझ्यावर वाकड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला ना.. आता मी तुला सोडत नाही, असे म्हणून प्रदीप याने फिर्यादी महिलेस ब्लॉक फेकून मारला. त्यामुळे महिलेच्या गुडघ्याला मार लागून त्या खाली पडल्या. त्यानंतर आरोपीने त्यांच्या पोटावर लाथ मारून गळ्यातील १६ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसका मारून जबरदस्तीने तोडून त्याच्या खिशात ठेवले. त्यावेळी महिलेने विरोध केला असता त्यांच्या हातातील पर्स त्यामधील रोख रक्कम ८ हजार रुपये व मोबाईल हिसकावला. एकूण ४१ हजारांचे सोन्याचे दोन मंगळसूत्र, मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेऊन आरोपी प्रदीप जाधव त्याच्या गाडीवर बसून पळून गेला.सांगवी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस