शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यूट्यूबवर ‘हिट्स’साठी केलेले ‘नृत्य’ ठरले शिक्षेसाठी ‘फिट’; कोर्टाने जनजागृती करण्याची सुनावली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 02:40 IST

जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेतून नृत्य करण्याचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, हिट्स मिळविणाऱ्या तीन उच्च शिक्षित तरुणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या.

मुंबई : जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेतून नृत्य करण्याचे व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करून, हिट्स मिळविणाऱ्या तीन उच्च शिक्षित तरुणांना रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. रामकुमार सुराह, अब्दुल मोहम्मद युसूफ आणि आणि कन्हैय्या कुमार अशी अटक करण्यात आलेल्या या त्रिकुटाची नावे आहेत. रेल्वे कोर्टाने आरोपींना रेल्वे स्थानकांत यासंदर्भात जनजागृती करण्याची शिक्षा सुनावली आहे.समाज माध्यमांवर अल्पावधीत प्रसिद्ध आणि यू ट्यूबच्या माध्यमाने पैसे मिळविण्यासाठी उच्च शिक्षित तिन्ही आरोपींनी जीव धोक्यात घालून धावत्या रेल्वेत किकी चॅलेंज केले. या आरोपींना सात दिवस एका समाज माध्यमाच्या मदतीने रेल्वे स्थानकांत जनजागृती करण्याची शिक्षा रेल्वे न्यायालयाने सुनावली आहे.धारावी येथे राहणारा सुराहने बीएससी आयटीचे आणि अब्दुल व कन्हैय्या या दोघांनी इलेक्ट्रॉनिक्स अभियंत्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाट क्रमांक ३ आणि ४ वर २९ जुलैला दुपारच्या सुमारास व्हिडीओ शूट करून यूट्यूबवर अपलोड केला होता. रेल्वे सुरक्षा बलाने अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.रेल्वे सुरक्षा बलाला, किकी चॅलेंजमधील आरोपी शीव स्थानक परिसरातील धारावी येथे ये-जा करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सापळा रचून तिघांना अटक केली. तिन्ही आरोपींनी चौकशीवेही किकी चॅलेंजनुसार व्हिडीओ शूट करूनतो ३० जुलै रोजी अपलोड करण्यात आल्याचे कबूल केले.विरार स्थानकावरील किकी चॅलेंजरला शिक्षाविरार रेल्वे स्थानकावर किकी चॅलेंज पूर्ण करणाºया तरुणांना विरार आरपीएफने यापूर्वीच बेड्या ठोकल्या. या प्रकरणी तिघांना रेल्वे न्यायालयाने वसई स्थानकाची स्वच्छता करण्याची शिक्षा सुनावली होती.

टॅग्स :Courtन्यायालय