शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

नागपुरातील ‘हिट ॲंड रन’ प्रकरणातील हलगर्जी भोवली, वाठोड्यातील पोलीस ठाणेदार निलंबित

By योगेश पांडे | Updated: June 19, 2024 22:21 IST

रक्ताचे नमुने दोन दिवस पोलिस ठाण्यातच ठेवले : गंभीर प्रकरणात पोलिसांची अक्षम्य चूक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फुटपाथवर झोपलेल्या गरीबांना चिरडण्याच्या प्रकरणामुळे शहरातील पार्टीकल्चर आणि पोलिसांचे दुर्लक्ष या बाबी परत ऐरणीवर आल्या आहेत. या गंभीर अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्यावरदेखील पोलिसांनी हलगर्जी दाखविली. आरोपी कार चालक आणि त्याच्या साथीदारांच्या रक्ताचे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्याऐवजी दोन दिवस पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. ही बाब समोर आल्यानंतर वाठोडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय दिघे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

१६ जून रोजी मध्यरात्री दिघोरी टोलनाक्याजवळ मद्यधुंद विद्यार्थ्यांनी फुटपाथवर झोपलेल्या नऊ गरीब लोकांना चिरडले. सोमवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जेवण करून फुटपाथवर झोपले असताना मद्यधुंद विद्यार्थ्यांनी त्यांना धडक दिली व त्यात कांतीबाई गजोड बागडिया (वय ४२) व सीताराम बाबूलाल बागडिया (३०) यांचा मृत्यू झाला. तर सीतारामची पत्नी कविता (२८), मुलगा बुलकू (८), मुलगी हसीना (३), सकिना (१.५), हनुमान खजोड बागडिया (३५), त्याचा मुलगा विक्रम ऊर्फ भुशा (१०), पानबाई मानसिंग बावरिया (१५) हे जखमी झाले होते. हे सर्व लोक राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील गुंडी येथून कामासाठी नागपुरात आठ महिन्यांअगोदर आले होते. पोलिसांनी या प्रकरणात घटनास्थळावरून फरार झालेला चालक भूषण नरेश लांजेवार (२०, प्लॉट क्रमांक १५, सेनापतीनगर, दिघोरी) याच्यासह वंश राजू झाडे (१९, योगेश्वरनगर, वाठोडा), सन्मय दिगांबर पात्रीकर (२०, अंबानगर, दिघोरी), अथर्व बानाईत (२०, अयोध्यानगर), ऋषिकेश धनंजय चौबे (२०, रामेश्वरी) व अथर्व मोगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती.

वाठोडा पोलिसांनी १७ जूनच्या पहाटे वैद्यकीय तपासणीत आरोपी विद्यार्थ्यांच्या रक्ताचे नमुने घेतले होते. डॉक्टरांनी नमुने वाठोडा पोलिसांच्या ताब्यात दिले. नियमानुसार हे नमुने तातडीने फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जातात. त्याच्या अहवालाच्या आधारे आरोपींवर कारवाई केली जाते. आरोपींना शिक्षा होण्यासाठीही हा अहवाल प्रभावी ठरतो. वाठोडा पोलीस ठाण्याचे अधिकारी विजय दिघे ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा तपास करत होते. आरोपींचे नमुने तातडीने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणे बंधनकारक होते. यामध्ये दिघे यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यांनी पोलिस ठाण्यातच नमुने ठेवले. १७ आणि १८ जून रोजी पोलिस ठाण्यात नमुने ठेवण्यात आले होते. हे नमुने निर्धारित तापमानात ठेवले जातात. याचे पालन न केल्याने अहवालात लक्षणीय बदल होऊ शकतात. याचा फायदा आरोपींना होऊ शकतो. हा घोर निष्काळजीपणा आज सकाळी उघडकीस आला. याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. रवींद्ररुमाप सिंगल यांनी दिघे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश जारी केले. त्यानंतर हे नमुने फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले. सीमा दातारकर यांच्याकडे वाठोडा पोलीस ठाण्याचा प्रभार देण्यात आला आहे.

नमुने बदलले का ?पुण्यात अल्पवयीन मुलगा आरोपी असताना तेथे त्याच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉक्टर आणि त्याच्या सहाय्यकांना अटक करण्यात आली होती. नागपुरातील या प्रकरणात रक्ताचे नमुने बदलण्यात तर आले नाही ना अशीच चर्चा रंगली होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी