शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाख लंपास करणाऱ्या चोरट्यास हिंगणघाट पोलिसांनी मध्य प्रदेशातून केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2021 16:53 IST

Robber nabbed by HInganghat police : या चोरीत वापरलेले दुचाकी वाहन मोबाईल, 3 हजार 280 रोख असा 44हजार 280 रुपयांचा माल  पोलीसांनी त्याचे कडून जप्त केले आहे.

ठळक मुद्देदुसरा आरोपी रोशन अनिल डोंगरे वय 25 यास मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील लोधिखेडा गावातून अटक केली आहे.

हिंगणघाट (वर्धा) - येथील संत चोखोबा वार्ड येथे झालेली आठ लाखाची घरफोडी  हिंगणघाट पोलिसांनी  दोन दिवसात उघड केली असून, यातील दुसरा आरोपी रोशन अनिल डोंगरे वय 25 यास मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील लोधिखेडा गावातून अटक केली आहे. या चोरीत वापरलेले दुचाकी वाहन मोबाईल, 3 हजार 280 रोख असा 44हजार 280 रुपयांचा माल  पोलीसांनी त्याचे कडून जप्त केले आहे.     

शहरातील संत चोखोबा वॉर्ड येथील जितेंद्र अमरनाथ राउत (वय 37) यांच्या घरी कुलूप तोडून आठ लाख रुपये रोख व सोने स्वरूपातील चोरी रविवार १४ मार्चला झाली होती. ते गावोगावी फिरून बाजारा बाजारांमध्ये हॉटेलचा फिरता व्यवसाय करतात. या व्यवसायातून त्यांच्याकडे साडे पाच लाख रुपये रोख  जमा झाले होते. हे जमा झालेले पैसे ते आपल्या घरातील कपाटात डब्यांमध्ये भरून ठेवत असे. तसेच घरातील सर्व सोने जवळपास आठ तोळे हे देखील कपाटातील डब्ब्यात ठेवलेले होते. राऊत यांची दोन्ही मुले हे मोठी वणी येथे त्यांच्या मामाकडे शिक्षणासाठी म्हणून ठेवलेली आहेत. या दोन्ही मुलांना भेटण्यासाठी जितेंद्र राऊत आपल्या पत्नीसोबत शनिवारी 13 मार्च रोजी गेले होते. सोमवारी सकाळी ते घरी आल्यावर त्यांना त्यांच्या घराचे दार खुले दिसले घरात जाऊन बघितलं तर कपाटातील सर्व सोने व नगदी पैसे असे एकूण आठ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असल्याचे त्यांना निदर्शनात आले. लगेच त्यांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांनी दिली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच फिंगरप्रिंट देखील घेण्यात आले. या प्रकरणात घरफोडी झालेल्या घराच्या परीसरातच राहणार्‍या सोन्यालसिंग उर्फ सोनु भादा(२८) याला  हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असता  त्याने दोन साथीदारांना सोबत घेउन रविवार दि.१४ च्याच रात्री ही घरफोडी घडविली असल्याचे पोलिसांना सांगीतले. त्याच्या कडून चोरी केलेली एक सोन्याची पोत, तीन कर्ण फुले व नगद 25 हजार रुपये पोलिसांनी अगोदरच हस्तगत केले आहे.     

या गुन्ह्याचा तपास पोलिस अधिक्षक डॉ  प्रशांत होळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संपत चव्हाण करीत असून त्यांना स. फौजदार सादिक शेख, विवेक बन्सोड, गुन्हे शोध पथकाचे शेखर डोंगरे, शि. प्रशांत वाढई सहकार्य करीत आहे

टॅग्स :ArrestअटकRobberyचोरीPoliceपोलिस