शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

तिच्यासाठी 'त्याने' चक्क कापल्या हाताच्या नसा! तरुणाची विवाहित महिलेवर जबरदस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 06:47 IST

बेलतरोडीतील दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षांच्या एका महिलेसोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली. नंतर टॅक्सी ड्रायव्हर असलेला पाटील गेल्या वर्षी नागपुरात आला.

जळगाव : विवाहित महिलेच्या प्रेमातून एका तरुणाने स्वतःच्या हाताच्या नसा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नागपुरातील बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडली. दीपक संजय पाटील (२७) असे आरोपीचे नाव आहे. तो एनगाव (जि.जळगाव) येथील रहिवासी आहे. ‘हिच्यावाचून मी जगू शकत नाही. मला करमतच नाही,’ असे त्याने पोलिसांना सांगितले. 

बेलतरोडीतील दोन मुलांची आई असलेल्या ३५ वर्षांच्या एका महिलेसोबत त्याची फेसबुकवर ओळख झाली. नंतर टॅक्सी ड्रायव्हर असलेला पाटील गेल्या वर्षी नागपुरात आला. त्याने महिलेशी संपर्क साधून तिचा पत्ता जाणून घेतला आणि तिच्या घरी पोहोचला. तेथे त्याने जाणे-येणे वाढविल्याने या दोघांचे सूत जुळले. बरेच दिवस त्यांचे प्रेमसंबंध गुपचूप सुरू होते. ३० जुलै २०२० रोजी त्याने या महिलेला जळगावला पळवून नेले. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी मोबाइलवरून माग काढून जळगाव गाठले. तेथे त्यांनी महिलेला विचारपूस केली असता मी स्वमर्जीने पाटीलसोबत आले आणि आता मला परत यायचे नाही. पाटील सोबतच राहायचे आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे पोलीस परत आले. 

तब्बल सात महिने हे दोघे जळगावला पती-पत्नीसारखे राहत होते. नंतर त्यांच्यात खटके उडाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ही महिला नागपुरात घरी परतली. नवऱ्यानेही तिला स्वीकारले. सर्व सुरळीत असताना पाटील पुन्हा नागपुरात परतला. त्याने महिलेचे घर गाठले. तेथेच दोन दिवस मुक्काम ठोकला आणि तिला सोमवारी दुपारी जळगावला घेऊन जाण्यासाठी जबरदस्ती करू लागला. महिलेने नकार दिला. त्यामुळे त्याने दोन्ही हाताच्या नसा कापून घेतल्या.