शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

किहीममधील रेव्ह पार्टी, हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर धाड; दोन बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 21:27 IST

रायगड गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई, २६ ग्रॅम कोकेन केले जप्त

ठळक मुद्दे१४ जणांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी, सात मुलींची सुधारगृहात रवानगी बहुतांश जणांनी मद्य सेवनाबरोबरच अमली पदार्थांचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आला.

आविष्कार देसाईअलिबाग - तालुक्यातील किहीम आणि कनकेश्र्वर फाटा येथील फार्म हाऊसवरील रेव्ह पार्टीसह हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर रायगड पोलिसांनी छापा टाकून २१ जणांना अटक केली. त्यामध्ये दोन बॉलीवूडमधील सिनेतारकांचा समावेश आहे. पोलिसांनी याप्रकरणी अनैतीक व्यापार प्रतिबंधक आणि एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात पिडीत मुलींची सुटका केली, तर १४ आरोपींची ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.अलिबाग जवळीलच कनकेश्वर फाटा येथील सक्सेना फार्म आणि किहीम येथील चिराणीका फार्मवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टी आणि वेश्या व्यवसायावर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुरुवारी मध्यरात्री कारवाई केली. हा सापळा पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून रचला होता. छापा टाकला तेव्हा पार्टी चांगलीच रंगात आली होती. त्यामध्ये बहुतांश जणांनी मद्य सेवनाबरोबरच अमली पदार्थांचे सेवन केल्याचा पोलिसांना संशय आला. राखी नोटानी हिच्याकडे १५ ग्रॅम, तर रंजीता सिंग उर्फ रेणू हिच्याकडे ११ ग्रॅम कोकेन हा आमली पदार्थ सापडला. त्यानंतर पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांची जिल्हा सरकारी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सात पिडीत मुलींची कर्जत येथील महिला सुधारगृहात तर १४ आरोपींना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. आरोपी हे सर्व हाय प्रोफाईल कॅटेगरीतील असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यातील काही उद्योगजगतातील तर काही बॉलीवूडशी संबंधीत आहेत. दरम्यान, काहीच महिन्यापूर्वी रायगड पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यानंतरची हि सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटProstitutionवेश्याव्यवसायPoliceपोलिसArrestअटकDrugsअमली पदार्थ