शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा; अटक करण्यापूर्वी मुंबई पोलिसांना द्यावी लागणार नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 16:32 IST

High Court granted relief to Sameer Wankhede :राज्य सरकारने वानखेडेंच्या या याचिकेला विरोध केला. तसेच समीर वानखेडेंविरोधात सध्या चार तक्रारी आल्या आहेत.

ठळक मुद्देमुंबई पोलिसांना अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३ दिवसांची नोटीस समीर वानखेडे यांना देण्यास सांगितले आहे. 

एनसीबीचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याविरोधात मुंबईत काही ठिकाणी तक्रारी दाखल झाल्यामुळे मुंबई पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यासाठी एक विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. या पथकाकडून करण्यात येणाऱ्या कठोर कारवाईविरोधात दिलासा मिळवण्यासाठी याचिका समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका निकाली काढत उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिलासा देत मुंबई पोलिसांना अटकेची कारवाई करण्यापूर्वी ३ दिवसांची नोटीस समीर वानखेडे यांना देण्यास सांगितले आहे. 

 

मुंबई पोलीस अटक करतील अशी या भीतीने समीर वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने त्यांना तूर्तास दिलासा दिला आहे. वानखेडे यांनी आपल्या याचिकेत माझ्यावरील आरोपांविषयी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपास पथकाकडून आधीच चौकशी सुरू झाली आहे. मग मुंबई पोलिसांच्या स्वतंत्र विशेष तपास पथकाची आवश्यकता काय? मुंबई पोलीस मला टार्गेट करेल. 

राज्य सरकारने वानखेडेंच्या या याचिकेला विरोध केला. तसेच समीर वानखेडेंविरोधात सध्या चार तक्रारी आल्या आहेत. त्याची मुंबई पोलिसांचे वरीष्ठ अधिकारी चौकशी करत आहेत. तपास सध्या अगदीच प्राथमिक अवस्थेत आहे. तूर्तास कुठेही गुन्हा नोंदवलेला नाही, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयाला दिली.

 

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेHigh Courtउच्च न्यायालयNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोMumbaiमुंबईPoliceपोलिस