शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

रहिवासी सोसायट्यांमध्ये पशूहत्येस उच्च न्यायालयाने घातली बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 21:43 IST

समाजमंदिराच्या एक किलोमीटर परिघात असलेल्या सोसायट्यांच्या आवारातही पशुहत्येस मनाई केली.

ठळक मुद्देष्ठ वकील रजनी अय्यर यांनी ट्रस्टच्यावतीने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे बाजू मांडली.घरामध्ये पशुहत्या करण्यास आम्ही मनाई करत आहोत.

मुंबई - सार्वजनिक सुरक्षा, स्वच्छतेमुळे घरातच पशुहत्या करण्याची परवानगी देण्यासंबंधीच्या धोरणाचा स्वीकार करणे अशक्य आहे, असे म्हणत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला घरातच पशुहत्येस परवानगी देण्यास नकार दिला. तसेच समाजमंदिराच्या एक किलोमीटर परिघात असलेल्या सोसायट्यांच्या आवारातही पशुहत्येस मनाई केली.बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोणत्याही सणाच्या वेळेस घरात, सोसायटीमध्ये पशुहत्या करण्यास तात्पुरती परवानगी देण्यासंबंधी धोरण आखले. या धोरणाला जीवमैत्री ट्रस्टने उच्च न्यायालयात आव्हान दिले. ज्येष्ठ वकील रजनी अय्यर यांनी ट्रस्टच्यावतीने न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे बाजू मांडली.महापालिका लोकांना त्यांच्या घरी, सोसायट्यांच्या आवारात पशुहत्या करण्याची परवानगी देऊ सार्वजनिक आरोग्याशी खेळत आहे. तसेच एअरक्राफ्ट नियमांचेही उल्लंघन करून विमान प्रवाशांचा जीव धोक्यात आणत आहे, असा युक्तिवाद अय्यर यांनी केला.महापालिकेच्यावतीने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी याचिकेवर आक्षेप घेतला. महापालिका नियमांच्याअधीन राहून परवानगी देईल. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेतली जाईल. सुमारे ८००० लोकांनी घरातच पशुहत्या करण्यासाठी अर्ज केले आहेत, असे साखरे यांनी न्यायालयाला सांगितले.न्यायालयाने याबाबत आदेश देताना म्हटले की, सार्वजनिक सुरक्षा, स्वच्छतेमुळे घरातच पशुहत्या करण्याची परवानगी देण्यासंबंधीच्या धोरणाचा स्वीकार करणे अशक्य आहे. ‘मुंबईची लोकसंख्या मोठी आहे आणि हे शहर दाटीवाटीचे आहे. येथील घरेही छोटी आहेत. त्यामुळे घरातच पशुहत्या करून स्वच्छता राखता येईल, यावर आमचा विश्वास नाही. या घरांमध्ये तरुण, वृद्ध दोन्हीही राहतात आणि त्यांच्या आरोग्याची व स्वच्छतेची आम्हाला काळजी आहे. त्यामुळे घरातच पशुहत्या करण्यासाठी अर्ज न स्वीकारण्याचा आदेश आम्ही देत आहोत,’ असे न्यायालयाने म्हटले.घरामध्ये पशुहत्या करण्यास आम्ही मनाई करत आहोत. तसेच समाजमंदिरांच्या एक किलोमीटर परिघात असलेल्या सोसायट्यांनाही त्यांच्या आवारात पशुहत्या करण्यास मनाई करण्यात येत आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. महापालिका सार्वजनिक आरोग्याची काळजी घेईल, अशी अपेक्षा आम्ही करतो, असे म्हणत उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी १४ आॅगस्ट रोजी ठेवली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयBakri Eidबकरी ईदCourtन्यायालय