शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
4
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
5
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
6
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
7
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
8
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
10
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
11
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
12
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
14
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
15
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
16
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
17
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
18
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
19
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
20
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी

मोठा घोटाळा उघडकीस, सर्वसामान्यांचे ₹500 कोटी स्वाहा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 21:42 IST

याप्रकरणी पोलिसांनी यूट्यूबर एलविश यादव, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि कॉमेडियन भारती सिंहला समन्स बजावले आहे.

HIBOX Scam: देशात ऑनलाइन फसवणुकीचे आणखी एक मोठे प्रकरण उघडकीस आले आहे. एका 30 वर्षीय व्यक्तीने सुमारे 30,000 लोकांची 500 कोटी रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे, या घोटाळ्यात अनेक हाय प्रोफाइल यूट्यूबर्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटींचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल IFSO (इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) ने चेन्नईचा रहिवासी मास्टरमाइंड शिवरामला अटक केली आहे. 

घोटाळा कसा झाला?आरोपी शिवरामने नोव्हेंबर 2016 मध्ये सवरुल्ला एक्सप्रेस प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी स्थापन केली आणि फेब्रुवारी 2024 मध्ये HIBOX नावाचे ॲपही लॉन्च केले. HIBOX ॲपचा गुंतवणूक योजना म्हणून प्रचार करण्यात आला होता. यामध्ये दररोज 1 ते 5 टक्के, म्हणजेच महिन्यात 30 ते 90 टक्क्यापर्यंत व्याज देण्याचे आमिष दाखवण्यात आले. झटपट नफा मिळवण्याच्या हव्यासापोटी हजारो लोकांनी या ॲपमध्ये गुंतवणूक केली. सुरुवातीला ॲपने परतावा देण्यास सुरुवात केली, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा अॅपवरील विश्वास वाढला. परंतु जुलै 2024 पासून तांत्रिक त्रुटी आणि कायदेशीर वैधतेचे कारण देत पेमेंट थांबवले.

या सेलिब्रिटींची नावे पुढे या घोटाळ्यात यूट्यूबर एल्विश यादव, लक्ष्य चौधरी, अभिषेक मल्हान, कॉमेडियन भारती सिंग आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांसारख्या मोठ्या सेलिब्रिटींची नावे समोर आली आहेत. या सर्वांनी HIBOX ॲपची जाहिरात केली होती. पोलिसांनी या सर्वांना 3 ऑक्टोबर रोजी नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलावले आहे.

बँक खाते जप्तपोलिस उपायुक्त (IFSO स्पेशल सेल) हेमंत तिवारी यांनी सांगितले की, हायबॉक्स अॅप नियोजित घोटाळ्याच्या केंद्रस्थानी होते. IFSO युनिटने शिवरामच्या चार बँक खात्यांमधील 18 कोटी रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) नोटीसही पाठवण्यात येणार आहे. या प्रकरणात, Easebuzz आणि Phonepe सारख्या पेमेंट गेटवे कंपन्यांच्या भूमिकेचाही पोलीस तपास करत आहेत. या कंपन्यांनी नियमांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. 

 

टॅग्स :fraudधोकेबाजीBharti Singhभारती सिंगRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीCrime Newsगुन्हेगारी