शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत वन विभागाच्या भरती परीक्षेत ‘हायटेक’ कॉपीचा प्रकार, दोघांवर गुन्हा दाखल

By शरद जाधव | Updated: August 6, 2023 00:07 IST

परीक्षा सुरू असताना तपासणीसाठी आलेल्या पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

सांगली : वन विभागाच्या भरती परीक्षेतील गैरप्रकार संपूर्ण राज्यात गाजत असताना सांगलीतही वन विभागाच्या परीक्षेत चलाखीने कॉपी करणाऱ्या दाेघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. परीक्षा सुरू असताना तपासणीसाठी आलेल्या पथकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

अविनाश संजनसिंग गुमलाडू (रा. शिवगाव, ता. वैजापूर) आणि अर्जुन रतन नार्डे (रा. संजरपूर वाडी, ता. वैजापूर) अशी संशयितांची नावे आहेत. वन अधिकारी युवराज पाटील यांनी दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यातील अविनाश गुमलाडू याला अटक करण्यात आली आहे. मिरज रोडवर असलेल्या वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्चमध्ये वनरक्षक पदासाठीच्या भरतीचा पेपर गुरुवारी होता. 

दुपारच्या सुमारास पेपर सुरू झाल्यानंतर संशयित अविनाश गुमलाडू याने त्याच्या बुटामध्ये मोबाइल लपवून ठेवला होता, तर केसांतून मोबाइल ब्ल्यूटुथ हेडफोन लावून तो पेपर लिहीत होता. गंभीर बाब म्हणजे मोबाइलवरून औरंगाबाद जिल्ह्यातीलच असलेला दुसरा संशयित अर्जुन नार्डे हा त्याला उत्तरे देत होता. परीक्षेदरम्यान तपासणीसाठी आलेल्या वन विभागाच्या पथकास ही बाब निदर्शनास आली. 

यावेळी केलेल्या तपासणीत त्याच्याकडे मायक्रोफोन, मोबाइल, सँडल जोड, डिव्हाइस, अशा ३ हजार ४५० रुपयांच्या वस्तू मिळून आल्या. या माध्यमातूनच तो कॉपी करत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने संशयिताला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर त्यास अटक करण्यात आली आहे.

यापूर्वीही गैरप्रकारांचा संशयपोलिसांच्या चौकशीत संशयित गुमलाडू याने सांगितले की, मोबाइल आणि डिव्हाइस हे दुसरा संशयित नार्डे याने दिले असून, पेपर सुरू झाल्यानंतर तो याद्वारे उत्तरे देत होता. नार्डे याने यापूर्वीही अनेक शासकीय परीक्षांत या प्रकारे गैरप्रकार केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार आता तपास सुरू करण्यात आला आहे.

मोठे रॅकेट असण्याची शक्यतावन विभागाच्या तपासणी पथकाने हा प्रकार उघडकीस आणला असला तरी, तंत्रज्ञानाची मदत घेत परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यातच छत्रपती संभाजीनगर येथे एका अकॅडमीचा संचालकच प्रश्नांची उत्तरे देताना पोलिसांना सापडला होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी