शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बोगस क्रेडिट कार्डच्या मदतीने मॅनेजरने घातला बँकेला कोट्यवधींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 22:07 IST

फसवणूकीप्रकरणी मॅनेजरला अटक 

ठळक मुद्दे प्रथमदर्शी ही फसवणूक 34 लाख रुपये असल्याचे पुढे आले होतेपोलीस तपासात मुजावर यांनी 2012 पासून बॅंकेला तब्बल 3 कोटी रुपयांना गंडवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मुजावरला अटक बोगस ग्राहक दाखवून बॅंकेकडून मिळणारा मोबदला स्वत: च्या खात्यावर जमा करून घेतले

मुंबई - बोगस क्रेडिटकार्डच्या मदतीने बॅंकेलाच कोट्यावधी रुपयांना गंडा घालणाऱ्या शाखा व्यवस्थापकाला शिवडी पोलिसांनीअटक केली आहे. नदरूल मुजावर असे या आरोपी व्यवस्थापकाचे असून न्यायालयाने त्याला 3 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रथमदर्शी ही फसवणूक 34 लाख रुपये असल्याचे पुढे आले होते. मात्र, पोलीस तपासात मुजावर यांनी 2012 पासून बॅंकेला तब्बल 3 कोटी रुपयांना गंडवल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी मुजावरला अटक केली. फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे.   

राष्ट्रीयकृत बॅंकेच्या व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेले मुजावर याची 2012 साली बॅंकेच्या क्रेडिट कार्ड रिकव्हरी विभागात बदली झाली होती. रिकव्हरी विभागाचे कार्यालय शिवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या रे रोड परिसरात आहे. मागील सात वर्षापासून मुजावर हे क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांकडून पैसे जमा करून घेऊन तो अहवाल पुढे बॅंकेला पाठवत होते. दरम्यान या अहवालात मुजावर यांनी बोगस ग्राहक दाखवून बॅंकेकडून मिळणारा मोबदला स्वत: च्या खात्यावर जमा करून घेतले.  नोव्हेंबर 2018 मध्ये मुजावर यांची त्या विभागातून बदली झाली. त्या विभागात नव्याने आलेल्या चिफ रिकव्हरी विभागाच्या अधिकाऱ्याच्या मुजावरने केलेला फसवणुकीचा प्रकार उघड लक्षात आला. मुजावर यांनी बॅंकेची 34 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे दाखवून देत बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देखील तक्रार केली. त्यानंतर मुजावर यांना बॅंकेने काढून टाकत या प्रकरणी बॅंकेने 20 डिसेंबर रोजी शिवडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. 

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसfraudधोकेबाजीbankबँक