शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

रोईंगपटू दत्तू भोकनळने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवापर्यंत तहकूब   

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 21:06 IST

पत्नीने दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनाळ याने हायकोर्टात याचिका दाखल केली. भोकनळ हा आपला स्वीकार न करता शारिरीक, मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.

मुंबई - रोईंगपटू दत्तू भोकनळनं हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. तक्रारदार पत्नीने आपली भूमिका मांडण्यासाठी हायकोर्टाकडे वेळ मागितला होता. कौटुंबिक हिंसाचार आणि फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्यासाठी दत्तू यांनी ही याचिका दाखल केली आहे. त्यामुळे ऑस्ट्रियाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारताचा आघाडीचा रोईंगपटू दत्तू भोकनाळ याने हायकोर्टात याचिका दाखल केली. पत्नीने दाखल केलेला कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा रद्द करण्यासाठी ही याचिका दाखल केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण ?

रिओ आॅलिम्पिक २०१६च्या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नौकानयनपटू दत्तू बबन भोकनळ यांच्या विरोधात एका पोलीस महिलेने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आपल्याशी विवाह करूनही दत्तू भोकनळ हा आपला स्वीकार न करता शारिरीक, मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पीडित महिलेने पोलिसांत दाखल केली आहे.

नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातील शिपाई आशा दत्तू भोकनळ (२६) यांनी आडगाव पोलीस ठाण्यात दत्तू भोकनळ विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, आळंदी येथे २२ डिसेंबर २०१७ रोजी आपला दत्तू यांच्याबरोबर विवाह झाल्यानंतर आशा यांच्या घरी व पुणे येथे दोघे काही दिवस पती-पत्नीप्रमाणे एकत्रही राहिले. दत्तू यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे ९ फेब्रुवारी २०१९ रोजी गावी जाऊन सर्वांसमक्ष लग्न करण्याचे ठरून लग्नाची खरेदीही केली. परंतु, सर्व तयारी करूनही दत्तू यांनी लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी तब्येत ठीक नसून दवाखान्यात अ‍ॅडमिट असल्याचे सांगत ७ फेबु्रवारीला लग्नाला येणार नसल्याचे कळविले. तसेच पुन्हा फोन करून लग्नाविषयी विचारले तर विष घेऊन आत्महत्या करू, असेही धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि, १३ व १४ फेब्रुवारी रोजी दत्तू भोकनळ आडगाव पोलीस मुख्यालय येथे आशा भोकनळ यांच्या घरी येऊन त्यांना शिवीगाळ करीत वादावादी केल्याचेही फिर्यादीचे म्हणणे आहे. दरम्यान, संगमनेर येथे २४ फे ब्रुवारी २०१९ पुन्हा नातेवाइकांसमोर विवाह करण्याचे ठरले. लग्नाची तयारी करूनही पुन्हा लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी दत्तू यांनी लग्नास नकार देत आपला नाद सोडून देण्याचे सुनावले. दि. ३ मार्चला आशा यांनी पुणे येथे जाऊन दत्तू यांच्याशी चर्चा केली, परंतु त्यांनी एकदा लग्न केलेले आहे. पुन्हा विवाहसमारंभ करणार नाही व आपल्यासोबत घरीही नेणारही नसल्याचे सांगत आपली फसवणूक केल्याचा आरोप आशा भोकनळ यांनी फिर्यादीतून केला आहे.  

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयDomestic Violenceघरगुती हिंसा