शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट सुप्रीम काेर्टात सुनावणी, उद्याेजकाला घातला सात काेटींचा गंडा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2024 06:16 IST

गुवाहाटीतून २ आराेपींना अटक, अटकेची भीती दाखवून फसविले

लुधियाना : सायबर भामटे काेणत्या थराला जातील, याची कल्पनाही करता येणार नाही. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नावाने बनावट सुनावणी करून अटकेची भीती दाखवून वर्धमान समूहाचे अध्यक्ष एस.पी. ओसवाल (८२) यांना तब्बल ७ काेटी रुपयांनी गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सायबर पाेलिसांनी आंतरराज्यीय टाेळीची ओळख पटविली असून, दाेन जणांना गुवाहाटी येथून अटक केली. आराेपींकडून सुमारे ६ काेटी रुपये परत मिळविण्यात यश आले आहे. 

एस.पी. ओसवाल यांना २०१० मध्ये पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सायबर भामट्यांनी काही उद्याेगपतींना अडकविण्यासाठी जाळे विणले हाेते. ओसवाल यांनी लुधियाना पाेलिसांकडे फसवणुकीची तक्रार केली. त्यानंतर, पाेलिसांनी बँक खात्यांचा तपास करून या टाेळीचा म्हाेरक्या अतनू चाैधरी आणि आनंद चाैधरी यांना गुवाहाटी येथून अटक केली. 

फसवणुकीचा धंदा कशामुळे? nआराेपींचा व्यवसाय काेराेना काळात ठप्प झाला. त्यांच्यावर ६ काेटीचे कर्जही झाले. त्यानंतर, त्यांनी सायबर फसवणुकीची याेजना आखली.nत्यात आणखी ७ जणांना सामील करून घेण्यात आले. 

अशी केली ओसवाल यांची फसवणूक एका भामट्याने माेबाइलवर काॅल करून आपण दिल्लीतून बाेलत असल्याचे सांगितले. सर्वाेच्च न्यायालयाने त्यांच्या नावे अटक वाॅरंट जारी केला आहे, तसेच मालमत्ता जप्तीची भीती दाखविली. ईडी, सीबीआय, तसेच कस्टम विभागाचाही दाखला त्यांना देण्यात आला. दुसऱ्या दिवशी सरन्यायाधीश सुनावणी करतील, असे सांगितले.

दुसऱ्या दिवशी ऑनलाईन सुनावणी सुरू झाली. सर्वाेच्च न्यायालयाचा बनाव रचण्यात आला. न्यायाधीश दिसत नव्हते. मात्र, त्यांचा आवाज येत होता. त्यांनी थेट ओसवाल यांची संपत्ती हस्तांतरीत करण्याचे आदेश दिले, अन्यथ अटक करा, असे सांगितले. अटक वाॅरंटही पाठविला. ओसवाल यांनी वाटाघाटी सुरू केल्या आणि तिथेच ते फसले. वेगवेगळ्या कायद्यांचा धाक दाखवून ओसवाल यांच्याकडून काेट्यवधी रुपये वसूल केले. 

बॅंक कर्मचारी  सामील?nया दाेघांच्या बँक खात्यात ७ काेटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले हाेते. nत्यापैकी ४ काेटी रुपये अतनू याच्या, तर ३ काेटी रुपये आनंद याच्या खात्यात जमा झाले हाेते. nया प्रकरणात आसाममधील बँकेचे कर्मचारीही सामील असण्याचा संशय पाेलिसांना आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी