शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 08:52 IST

Crime MP : एका व्यक्तीने एका महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी महिलेचे कपडे आणि बुरखा परिधान केला होता.

मध्यप्रदेशातील जबलपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने चोरीच्या इराद्याने एका महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी महिलेचे कपडे आणि बुरखा परिधान केला होता. ही घटना मंगळवारी (३० जुलै रोजी) गढा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील श्रीकृष्ण संकुलात घडली.

नेमकं काय घडलं?जबलपूरच्या श्रीकृष्ण संकुलातील फ्लॅट क्रमांक ७१२ मध्ये डॉ. नीलम सिंह (३५) आणि त्यांचे पती डॉ. वीरेंद्र सिंह भाड्याने राहतात. नीलम सिंह मेडिकल कॉलेज रुग्णालयात औषध विभागात कार्यरत आहेत. मंगळवारी त्या घरी एकट्या असताना आरोपी मुकुल कहारने त्यांच्यावर चाकूने सात ते आठ वार केले.

आरोपी मुकुल कहार हा रामपूर मांडवा वस्तीचा रहिवासी असून, तो पाणी वाटपाचं काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी मुकुलने डॉ. नीलम सिंह यांच्याकडे नोकरी किंवा कामासाठी विचारणा केली होती. मंगळवारी दुपारी त्याने महिलेचे कपडे आणि बुरखा घालून डॉ. नीलम यांच्या घरात प्रवेश केला. नीलम सिंह एकट्या असल्याचे पाहून त्याने त्यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केला.

सीसीटीव्हीमध्ये कैद झाली घटनाडॉ. नीलम यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारी धावले आणि त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पकडले. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे, ज्यामध्ये आरोपी घरात शिरताना आणि पळून जाताना दिसत आहे. लोकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आणि तत्काळ संजीवनी नगर पोलिसांना माहिती दिली. आरोपीकडून रक्ताने माखलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे. जखमी डॉ. नीलम सिंह यांना तात्काळ मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हया घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी दिसून आली. घटनेचं ठिकाण गढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतं, पण संकुलासमोरच १०० मीटर अंतरावर संजीवनी नगर पोलीस ठाणं आहे. त्यामुळे लोकांनी आधी संजीवनी नगर पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यांच्या हद्दीत येत नसल्याचं कारण देत त्यांनी मदत करण्यास नकार दिला. गढा पोलीस ठाणं केवळ एक किलोमीटर दूर असूनही, पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला दीड तास लागला, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. रुग्णवाहिकेलाही माहिती देऊनही ती दीड तास पोहोचली नाही, त्यामुळे स्थानिक लोकांनी ऑटोमधून डॉ. नीलम यांना रुग्णालयात पोहोचवलं. यामुळे पोलीस आणि प्रशासनाविरोधात लोकांमध्ये संताप दिसून येत आहे.

या घटनेने जबलपूरमध्ये खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMadhya Pradeshमध्य प्रदेश