शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

'तो' खून लुटमारीसाठी, मृतदेह फेकलेला नदीत; दोघांना अटक, एकजण पसार

By संजय पाटील | Published: March 01, 2024 10:11 PM

कऱ्हाडातील जुन्या कोयना पुलानजीक आठ दिवसांपुर्वीचे खून प्रकरण

संजय पाटील, कऱ्हाड: येथील जुन्या कोयना पुलानजीक आठ दिवसांपुर्वी झालेल्या खुनप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेवून अटक केले आहे. या गुन्ह्यात आणखी एकाचा सहभाग निष्पन्न झाला असून तो आरोपी पसार झाला आहे. खून झालेल्या व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही. लुटमारीच्या उद्देशाने हा खून झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर आल्याचे पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी सांगीतले.शकील अन्वर शेख (वय २०, रा. दैत्यनिवारणी मंदीरानजीक, कऱ्हाड) व कृष्णा लक्ष्मण पुजारी (वय २४, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कऱ्हाडनजीक जुन्या ब्रिटीशकालीन पुलाजवळ २३ फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास एका पुरूषाचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक के. एन. पाटील, गुन्हे शाखेचे पतंग पाटील, हवालदार शशी काळे, अमित पवार, कुलदीप कोळी यांच्यासह पथकाने तातडीने त्याठिकाणी भेट दिली. मृतदेह दोरीच्या सहाय्याने सिमेंट पाईपला बांधून पाईपसह तो नदीपात्रात टाकल्याचे पोलिसांना दिसून आले. संबंधिताचा खून झाल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला गती दिली. चार दिवस मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे तो सडलेला होता. परिणामी, मृताची ओळख पटविण्यात पोलिसांना अडचणी आल्या. पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याच्या तपासाची दिशा निश्चित करुन पोलिसांनी मुंबई, पुणे, चिपळूनसह कर्नाटक राज्यातही तपास यंत्रणा राबवली. मात्र, तरीही मृताची ओळख पटली नाही.

दरम्यान, एका बाजुला मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू असतानाच दुसरीकडे गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील, हवालदार शशिकांत काळे. अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे यांनी आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी या गुन्ह्यात दोघांची नावे निष्पन्न झाली. पोलिसांनी तातडीने त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी खून केल्याची कबुली देत मृतदेह नदीपात्रात टाकल्याचे सांगीतले. त्यामुळे पोलिसांनी दोघांनाही अटक केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीKaradकराड