शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

Hathras Gangrape : वेगळंच वळण! हाथरस प्रकरणात समोर आलं नक्षल कनेक्शन, बनावट वहिनी बनून रचला जात होता कट 

By पूनम अपराज | Updated: October 10, 2020 15:01 IST

Hathras Gangrape : याआधी शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित फंडिंग प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि भीमा आर्मीचे धागेदोरे सापडले आहेत.

ठळक मुद्देहाथरस घटनेची चौकशी करत एसआयटीच्या सूत्रांनी उघड केले की, नक्षलवादी महिलेने डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकला होता आणि ती पोलिस आणि एसआयटीशी बोलत होती. बहराइच पोलिसांचे म्हणणे आहे की, हा परिसर भारत-नेपाळ सीमेला लागूनच आहे आणि पीएफआयशी संबंधित इतर काही लोकांना अलिकडच्या काळात अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे. दरम्यान, शनिवारी हाथरस घटनेत नक्षल कनेक्शन समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. एसआयटीची टीम मध्य प्रदेशच्या जबलपूर येथील एका महिलेचा शोध घेत आहे. असे सांगितले जात आहे की, संशयित नक्षलवादी महिला पीडितेच्या घरात वहिनी म्हणून राहत होती. एसआयटीच्या चौकशीत असे निष्पन्न झाले आहे की, नक्षलवादी महिला पीडित मुलीच्या घरात 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या काळात कट रचत होती. याआधी शुक्रवारी पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाशी संबंधित फंडिंग प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) आणि भीमा आर्मीचे धागेदोरे सापडले आहेत.हाथरस घटनेची चौकशी करत एसआयटीच्या सूत्रांनी उघड केले की, नक्षलवादी महिलेने डोक्यावरून पदर घेऊन चेहरा झाकला होता आणि ती पोलिस आणि एसआयटीशी बोलत होती. त्याचवेळी घटनेच्या २ दिवसानंतर संशयित महिला पीडित मुलीच्या गावी पोहोचली होती. पीडित मुलीच्या घरात राहून ती कुटुंबातील सदस्यांना भडकावत असल्याचा आरोप केला जात आहे. पीडितेची वहिनी बनलेल्या नक्षलवादी कार्यकर्त्याच्या कॉल डिटेलमध्ये अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.सुरक्षा यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, यूपी पोलिस आणि एसआयटीची टीम परकीय फंडिंगसंदर्भात नक्षलवादी कनेक्शनवर तपास काम करत आहे. एसआयटीच्या तपासणीत यापूर्वी पहिले जातीय दंगलीचे षडयंत्र उघड झाले होते. पोलीस त्या महिलेचा आणि तिच्या जवळच्या मित्रांचा शोध घेत आहेत. तरीही एसआयटी टीमने ४ डझन लोकांची चौकशी केली आहे. हाथरस प्रकरणात पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून ते पीएफआयचे सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. 

नेपाळ सीमेवर पीएफआय उपक्रमअटक केलेल्या सदस्यांपैकी एक बहराइचमधील जरवलचा रहिवासी आहे. यानंतर, यूपी पोलिस सक्रिय झाले आहेत. बहराइच पोलिसांचे म्हणणे आहे की, हा परिसर भारत-नेपाळ सीमेला लागूनच आहे आणि पीएफआयशी संबंधित इतर काही लोकांना अलिकडच्या काळात अटक करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेश व देशात जातीय दंगली पसरवण्यासाठी भारत-नेपाळ सीमेवर पीएफआयच्या कोणत्या हालचाली सुरु आहेत हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :Hathras Gangrapeहाथरस सामूहिक बलात्कारnaxaliteनक्षलवादीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटकWomenमहिला