शहरं
Join us  
Trending Stories
1
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
2
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
3
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
4
बिल्सेरी, किनले, अक्वाफिनाला आता टक्कर देणार मुकेश अंबानी; ₹३०००० कोटींच्या व्यवसायात एन्ट्रीच्या तयारीत 
5
रशियाने मोठा धोका दिला? भारताच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत पाकिस्तानला फायटर जेटचं इंजिन देण्याचा निर्णय घेतला; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
6
Viral Video: अशा मित्रांपासून सावध राहिलेलं बरं; एकदा 'हा' व्हिडीओ बघाच!
7
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
8
दसरा मेळाव्यात भाषण सुरू असतानाच पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या, म्हणाल्या पोरांनो तुम्ही...  
9
“भारत खरोखरच स्वतंत्र आहे का?”; गीतांजली वांगचूक यांचा सवाल, केंद्रीय गृहमंत्रालयावर टीका
10
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
11
 ...मग पोलिसांची हत्या करावी लागली तरी हरकत नाही, समोर आला तौकीर रजाचा भयानक डाव
12
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
13
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
14
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
15
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
16
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
17
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
19
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
20
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!

आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 13:19 IST

हरियाणा पोलिसांनी चौघांची हत्या करणाऱ्या गँगस्टर रोमिल व्होराला एन्काऊंटरमध्ये ठार केलं.

Romil Vohra Encounter: हरियाणा पोलिसांच्या विशेष पथकाने दिल्ली-हरियाणा सीमेवर दारू व्यावसायिकाची हत्या करणाऱ्या गुन्हेगाराला चकमकीत ठार मारले. आरोपीविरुद्ध खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल होते. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिस त्याला अटक करण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येक वेळी तो पोलिसांना चकमा देऊन पळून जात होता. मात्र मंगळवारी २० वर्षीय या  गँगस्टरचा पोलिसांनी एन्काऊंटर केला.

हरियाणाच्या स्पेशल टास्क फोर्सने गुरुग्राममधील दिल्ली-हरियाणा सीमेवर झालेल्या चकमकीत कुख्यात गुंड रोमिल व्होरा याला ठार मारले. या चकमकीत कुख्यात गुंडाच्या  गोळीने दोन पोलीस उपनिरीक्षकही जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. गँगस्टर रोमिल व्होरा हा कुख्यात काला राणा-नोनी राणा गँगचा शूटर होता. काला राणा आणि नोनी राणा लॉरेन्स टोळीशी संबंधित आहेत. रोमिल सुमारे ८ महिन्यांपूर्वी त्यांच्यात सामील झाला होता.

कुरुक्षेत्रात गँगस्टर व्होराने काही दिवसांपूर्वीच दारू कंत्राटदार शंतनूची हत्या केली होती. याशिवाय, तो यमुनानगरच्या तिहेरी हत्याकांडाच्या प्रकरणातही फरार होता. अंबाला एसटीएफचे पोलीस उपअधीक्षक अमन कुमार यांनी एन्काउंटरची माहिती दिली. रोमिल बराच काळ पोलिसांच्या रडारवर होता आणि अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिसांना तो हवा होता, असं अमन कुमार म्हणाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा एसटीएफला माहिती मिळाली होती की रोमिल व्होरा दिल्ली-हरियाणा सीमेजवळील फरीदाबाद लिंक रोडवर आहे. त्यानंतर एसटीएफने परिसराला घेराव घातला आणि कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान, एसटीएफने रोमिलला घेराव घालण्याचा प्रयत्न करताच त्याने पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल एसटीएफनेही जोरदार गोळीबार केला. ज्यामध्ये रोमिल गंभीर जखमी झाला. त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या चकमकीत एसटीएफचे २ जवान एसआय प्रवीण आणि एसआय रोहन देखील जखमी झाले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आलं. रोमिल आणि दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना कुठे गोळी लागली याची माहिती समोर आलेली नाही. घटनेनंतर पोलिसांनी तपासासाठी फरिदाबाद लिंक रोड सुमारे साडेसहा तास बंद ठेवला आहे.

रोमिल फक्त २० वर्षांचा होता पण तो गुन्हेगारीच्या जगतात त्याचे नाव मोठं करु पाहत होता. यमुनानगरमधील कासापूर इथं राहणारा व्होरा हा तिहेरी हत्याकांड प्रकरणात हवा होता. त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्यानंतर त्याने यमुनानगरमध्ये दारू व्यावसायिक शंतनूची हत्या केली. त्यामुळे त्याच्याविरुद्ध कठोर पावले उचलण्यात आली. मंगळवारी हरिणाया पोलिसांनी रोमिलला घेराव घालून संपवले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाdelhiदिल्ली