शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर सासरी जात होती नवरी, बॉयफ्रेन्डने भर रस्त्यात गाडी अडवून झाडली तिच्यावर गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2021 12:39 IST

Haryana Crime News : जखमी नवरीला पीजीआय रोहतकच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तिची स्थिती गंभीर असून पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

हरयाणाच्या (Haryana) रोहतकमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक नवरी लग्नानंतर सासरी जात होती. त्यावेळी रस्त्यात तिच्यावर गोळी झाडण्यात आली. असं सांगितलं जात आहे की, काही लोकांनी नवरीच्या कार ओव्हरटेक करून थांबवलं. नवरदेवाला बाहेर काढलं आणि मग नवरीच्या मानेवर गोळी झाडली. हल्लेखोरांना नवरदेवाच्या भावाची सोन्याची चेनही घेतली आणि फरार झाले. जखमी नवरीला पीजीआय रोहतकच्या ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. तिची स्थिती गंभीर असून पोलीस प्रकरणाची चौकशी करत आहेत. 

नवरीवर रस्त्यात झाडली गोळी

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. सांपला गावात राहणाऱ्या तरूणीचं लग्न भाली आनंदपूर गावात राहणाऱ्या तरूणासोबत झालं होतं. शुक्रवारी नवरी लग्न करून आपल्या सासरी जात होती. कार नवरदेवाचा भाऊ सुनील चालवत होता. रात्री साधारण १२ वाजता गावातील शिव मंदिराजवळ पोहोचताच मागून इनोव्हा कारमधून तीन लोक आले. त्यांनी नवरीची कार थांबवली आणि नवरीवर गोळी झाडली. नवरी रक्ताच्या थारोळ्यात कारमधेच पडली. तिला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

असं सांगितलं जात आहे की, हे कृत्य नवरीचा पूर्वाश्रमीचा प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. चौकशी दरम्यान पोलिसांनी असंही समजलं की, हल्लेखोर सांपलापासूनच नवरीच्या कारचा पाठलाग कत होते. नवरी जशी आपल्या सासरच्या गावाबाहेर पोहोचली त्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

टॅग्स :HaryanaहरयाणाCrime Newsगुन्हेगारी