शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! घरात लेकीच्या लग्नाची तयारी अन् आई प्रियकरासोबत पळाली; दागिन्यांवरही मारला डल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 15:46 IST

मुलीच्या लग्नाच्या बरोबर दहा दिवस आधी आई तिच्या प्रियकरासह फरार झाली आहे.

उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये एक अजबच घटना घडली आहे. घरामध्ये लेकीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असताना आई प्रियकरासोबत पळाली आहे. एवढंच नाही तर सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास केले आहेत. हरिद्वार जिल्ह्यातील मंगलौर कोतवाली परिसरात ही हैराण करणारी घटना घडली आहे. मुलीच्या लग्नाच्या बरोबर दहा दिवस आधी आई तिच्या प्रियकरासह फरार झाली आहे. यासोबतच ती लग्नासाठी केलेले दागिने घेऊन पळून गेली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरात राहणाऱ्या एका 38 वर्षीय महिलेच्या मुलीचं लग्न होतं. पण त्याआधीच ती आपल्या प्रियकरासह पळून गेली आहे. लग्नासाठी घरात असलेले लाखो रुपये आणि दागिने घेऊन ती गेली. महिलेच्या पतीचं एका वर्षापूर्वी निधन झालं असून तिला चार मुलं आहेत. 14 डिसेंबरला मोठ्या मुलीचं लग्न असल्याने घरात आनंदाचं वातावरण होतं. 

लग्नासाठी खास पाहुणेमंडळी देखील आले आहेत. जोरदार तयारी सुरू आहे. असं असताना शनिवारी रात्री महिला आपल्या कुटुंबाला सोडून अचानक गायब झाली. कुटुंबीयांना तिच्या प्रियकराची देखील माहिती मिळाली. त्याची चौकशी केली असता तो देखील फरार असल्याचं समजलं. तसेच घरातून लाखो रुपये आणि लग्नासाठी केलेले दागिने देखील गायब असल्याचं दिसलं. यानंतर नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. 

मंगलौर कोतवालीचे एसएचओ राजीव रौथान यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आणि तिचा प्रियकर हे शनिवारी रात्रीपासून फरार आहेत. महिलेच्या मुलाचं 14 डिसेंबरला लग्न होतं. ती लग्नासाठी केलेल दागिने घेऊन पळून गेली आहे. महिला आणि तिचा प्रियकर हे एकाच ठिकाणी काम करायचे. त्यांनी पळून जाऊन लग्न केल्याची पोलिसांना शंका आहे. दोघांनाही शोधण्याचं काम सध्या सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्न