शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

भूत काढण्याच्या बहाण्याने महिलेचा विनयभंग; पतीविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 22:09 IST

४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघल्यामुळे तिच्या अंगात काही तरी येत असल्याच्या अंधश्रद्धेपोेटी पतीनेच मांत्रिकाला घरी आणून त्याच्यासमक्ष पत्नीच्या अंगातील भूत काढण्याकरिता पूजा करवून घेतली.

अमरावती : भूतबाधा झाल्याचे सांगून तथाकथित मांत्रिकाने मांडलेल्या पूजेत विवाहितेचा विनयभंग केला. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी मांत्रिक आणि पतीविरूद्ध भादंविची कलम ३५४, ५०९, ५०६, ३४ महाराष्ट्र नरबळी व इतर अनिष्ठ प्रथा जादूटोणा प्रतिबंधक अधिनियम २०१३ नुसार गुन्हा नोंदविला. ही घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास महादेवखोरी येथे घडली.  राजू गणेश गुडधे (३५, रा. पंचशीलनगर), असे गुन्हा दाखल झालेल्या मांत्रिकाचे व महेंद्र पांडे (४५, रा. महादेवखोरी), असे पूजेला संमती देणाºया पतीचे नाव आहे. या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलीससूत्रानुसार, ४० वर्षीय महिलेची प्रकृती बिघल्यामुळे तिच्या अंगात काही तरी येत असल्याच्या अंधश्रद्धेपोेटी पतीनेच मांत्रिकाला घरी आणून त्याच्यासमक्ष पत्नीच्या अंगातील भूत काढण्याकरिता पूजा करवून घेतली. मांत्रिकाने महिलेच्या अंगाला हळदी लावून तिला स्पर्श करून विनयभंग करताच या प्रकराला विरोध दर्शविला. त्यामुळे तिला धमकीही देण्यात आली. मात्र, तिने बुधवारी मांत्रिक व पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदविली. घरीच मांडली पूजाहळदीपात्र, कुंकू, लिंबू, गडव्यात घरी पूजा मांडण्यात आली. पूजा करण्यास महिलेचा विरोध असतानाही बळजबरीने पूजा करवून घेतली. यावेळी मांत्रिकाने तिच्या अंगावर हळदी लावून स्पर्श केला.

मांत्रिकाने विनयभंग केल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरून दोघांवर गुन्हा नोंदविला. याप्रकरणी घटनास्थळावर जाऊन तपास करण्यात येईल.- पुंडलिक मेश्राम, ठाणेदार फ्रेजरपुरा पोलीस ठाणे, अमरावती

टॅग्स :Molestationविनयभंग