शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनात वैधव्य आलेल्या सुनेचा छळ; सासरच्या सात जणांविरोधात न्यायालयाच्या आदेशान्वये गुन्हा दाखल 

By अनिल गवई | Updated: December 21, 2022 17:18 IST

पोलीसांनी न्याय न दिल्यामुळे न्यायालयीन प्रकीयेतून पिडीतेने पोलीसांना गुन्हा दाखल करण्यास बाध्य केले.

खामगाव : कोरोना काळात वैधव्य आलेल्या सुनेला तिच्या पतीच्या नावे असलेली शेत जमीन पेरण्यासाठी एक लाख रूपयांची मागणी करण्यात आली. तिच्या अंगावर राख फेकत काळी जादू करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सासरच्या सात जणांविरोधात ग्रामीण पोलीसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी न्याय न दिल्यामुळे न्यायालयीन प्रकीयेतून पिडीतेने पोलीसांना गुन्हा दाखल करण्यास बाध्य केले.

याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील तालुला देऊळगाव माहेर असलेल्या श्रीमती जीजाबाई संदीप तिडके (३३, रा.  शहापूर ता. खामगाव) या विधवेने ग्रामीण पोलीसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तिच्या पतीचा कोरोना काळात मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर ०६मे २०२१ ते ०७ जून २०२२या कालावधीत शहापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमात सासरच्यांनी अपशकुनी म्हणून अपमानास्पद वागणूक दिली. चापटाबुक्यांनी मारहाण करीत केस ओढून खाली पाडले. तसेच पतीच्या नावे असलेली जमिन वहिती करण्यासाठी एक लाखांची मागणी केली. त्याचवेळी घरात तसेच शेतीवर राहण्यास मज्जाव करीत जमिनीवर हातपाय दाबून ठेवले. तर सासºयाने अंगावर राख फेकत, काळी जादू करून जिवाने ठार करण्याची धमकी दिली, काहीतरी मंत्रोपचार केला. कैचिने विवाहितेचे केस कापून तिच्या अंगावरून लिंबूही उतरविले. तर काहींनी हातावर सुई टोचून रक्त काढले. जीवे मारण्याची धमकी देत घरातून हाकलून लावले. त्यामुळे आपण घर सोडले. त्यानंतर वडिलांच्या घरी राहून न्यायासाठी न्यायालयीन लढा दिला.  फियार्दीच्या लेखी रिपोर्ट व  वि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग कोर्ट नं. 2 खामगांव यांचा फौजदारी संहिता कलम १५६ (३) प्रमाणे आदेश झाल्याने ग्रामीण पोलीसांनी सासरच्या सात आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

सात आरोपींविरोधात गुन्हा दाखल -याप्रकरणी गौतम रूस्तम तिडके (६०), सुनंदा गौतम तिडके (५५), मिलिंद गौतम तिडके (३५), विशाखा मिलिंद तिडके (३०) सर्व रा. शहापूर ता. खामगाव आणि  सुरेश जनार्दन सदांशिव (३८), अर्चना सुरेश सदांशिव (३२) रा. सुकोडा टाकोडा खडकी ता. अकोला, प्रमोद गवई (४०)रा.दिग्रस बु. ता. पातूर जि. अकोला यांच्या विरोधात भादंवि कलम ३२३, ५०४, ५०६, ४८९- अ, ३४ तसेच जादूटोना प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस