शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

आईला त्रास दिला अन् नोकरी गेली म्हणून मुलाने रचला उद्योजकाच्या हत्येचा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 20:03 IST

सिनेस्टाइल झाला खुनाचा उलगडा, नंदकुमार यांच्यावर तलवार, चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढविताना शस्त्राचा एक वार चुकून एका हल्लेखोराच्या पायावर लागला

नाशिक : आपल्या आईची नोकरी गेली व तिला कंपनीत काम करताना त्रास दिला गेला, याचा राग मनात धरून त्या महिलेच्या मुलाने आपल्या तिघा मित्रांच्या मदतीने नंदकुमार आहेर यांच्यावर तलवार, चॉपरने हल्ला चढवून ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी या खुनाच्या घटनेचा तपास सुरू करत जखमी झालेल्या एका हल्लेखोराने दिलेल्या माहितीवरून या पूर्ववैमनस्यातून हा खून झाला असल्याची शक्यता प्रथमदर्शनी वर्तविली आहे. दरम्यान, या खुनाच्या घटनेतील चौघे संशयित हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून, एक रुग्णालयात उपचार घेत आहेत व त्याचे फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत असल्याचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये गरवारे पॉइंटजवळील असलेल्या आहेर इंजिनिअरिंग वर्क्स कंपनीत नेहमीप्रमाणे नंदकुमार आहेर (५०, रा. महात्मानगर) हे त्यांच्या स्कॉर्पिओ कारमधून (एमएच १५ जीए १८६१) आले. प्रवेशद्वारावर कारमधून ते उतरले असता दुचाकीने आलेल्या चौघांनी तलवार व चॉपरसारख्या धारधार हत्याराने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांच्या डोक्यात, पोटात व पाठीवर खोलवर वार लागले. दोघा कामगारांनी त्वरित पाथर्डीफाटा येथील रुग्णालयात हलविले व तेथून पुन्हा अधिक उपचारासाठी जुना आडगावनाक्यावरील अपोली रुग्णालयात दाखल केले; मात्र तेथे डॉक्टरांनी आहेर यांना तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. ‘गुगल’ श्वानाने हल्लेखोरांचा माग दाखविला त्या दिशेने पोलिसांनी जात रस्त्यात संशयितांपैकी एकाची चप्पल पोलिसांना आढळून आली. ही चप्पल हुंगल्यानंतर गुगल श्वान आणखी पुढे गेले. चौघा हल्लेखोरांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.असा आला हल्लेखोर पोलिसांच्या जाळ्यात !नंदकुमार यांच्यावर तलवार, चॉपरसारख्या धारदार शस्त्राने हल्ला चढविताना शस्त्राचा एक वार चुकून एका हल्लेखोराच्या पायावर लागला. यामुळे तोदेखील रक्तबंबाळ झाला. त्याच्या साथीदारांनी त्याला दुचाकीवरून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे त्यांना विचारले असता त्याला कंपनीत काम करताना पत्रा लागल्याने तो जखमी झाला, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, जखम बघून डॉक्टरांचा संशय बळावला असता त्याच वेळी नाशिक शहर डॉक्टर-पोलीस व्हॉट्सॲप ग्रुपवर खुनातील हल्लेखोर जखमी असून तो रुग्णालयात उपचारासाठी येऊ शकतो, असा मेसेज प्राप्त झाला. डॉक्टरांनी तो मेसेज वाचल्यानंतर त्यास उपचारासाठी दाखल करुन घेत पोलिसांना माहिती कळविली. घटनास्थळापासून काही अंतरावरच रुग्णालय असल्याने पोलीस तेथे पोहोचले; मात्र तोपर्यंत त्याच्या साथीदारांना चाहूल लागल्याने तिघे त्याला सोडून फरार झाले.