शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडसोबत साजरं करायचं होतं नवीन वर्ष म्हणून पत्नीचा काढला काटा; 'असा' झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 12:27 IST

नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.

उत्तर प्रदेशच्या हापूरमध्ये नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. प्रेयसीसाठी पत्नीने आपल्याच पत्नीचा काटा काढला आणि नंतर खोटी गोष्ट सर्वांना सांगितली. स्वत: हत्या केली पण पोलिसांना खून आणि खोट्या दरोड्याची कहाणी सांगितली. मात्र, पोलिसांनी 12 तासांत महिलेचा खून आणि दरोड्याचा बनाव उघड करून आरोपी पतीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती विकास शर्माने प्रेयसीसोबत मिळून पत्नी सोनियाला मारण्याचा प्लॅन तयार केला. 

गाझियाबादहून पत्नीला सोबत घेऊन पती निघाला. त्यानंतर रस्त्याच्या मधोमध दोरीने गळा आवळून हत्या केली. प्रेमप्रकरणात आडकाठी आल्याने आरोपी पतीने पत्नीला मार्गातून हटवून हापूर गाठले आणि दरोड्याच्या वेळी विरोध केल्याने पत्नीचा खून झाल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली. आरोपी पतीने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो निजामपूरजवळ पोहोचला तेव्हा अज्ञात चोरट्यांनी त्याची कार थांबवली आणि लुटमार सुरू केली. दरम्यान, पत्नीने विरोध केल्याने चोरट्यांनी तिची हत्या केली.

पोलिसांना ही घटना संशयास्पद वाटली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, त्यानंतर या घटनेचा सूत्रधार पतीच असल्याचे उघड झाले, ज्याने आपल्या मैत्रिणीसोबत मिळून पत्नीची हत्या केली होती. 12 तासांच्या आत घटनेचा खुलासा करताना हापूरचे एसपी दीपक भूकर यांनी सांगितले की, आरोपीचे औषध कंपनीत काम करणाऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध होते, ज्यामध्ये पती विकास शर्मा नोकरीला होता. ज्याची माहिती आरोपी पतीच्या पत्नीला होती. त्यानंतर दोघांमध्ये अनेकदा वाद झाले आणि वाद वाढतच गेला. त्यामुळे आरोपी पतीने प्रेयसीसोबत मिळून पत्नीला मार्गावरून दूर करण्याचा प्लॅन तयार केला आणि हापूरमध्ये तिची हत्या केल्यानंतर दरोडा आणि खुनाची बनावट माहिती पोलिसांना दिली.

अटक केलेल्या विकास शर्माच्या हत्येचे अनेक मार्ग मोबाईलवरून इंटरनेटवर शोधण्यात आल्याचा खुलासा हापूरच्या एसपींनी केला. गुगल सर्च इंजिनवरून पोलिसांना त्याची संपूर्ण माहिती मिळाली आहे. आरोपी पतीच्या ताब्यातून काही ऑडिओ रेकॉर्डिंगही पोलिसांना मिळाले आहेत. पोलिसांनी आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवले. आरोपीने नवीन वर्षात ज्या प्रेयसीसोबत राहण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याला अटक करून तुरुंगात पाठवले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी